रावेर, शालिक महाजन । रावेरपासून सुमारे ३५ कि.मी. अंतरावर असलेल्या मध्य प्रदेशातील आसिरगड किल्ला सध्या महाभारताच्या संबधामुळे चांगलाच चर्चेत आला आहे . या किल्ल्याने अनेक युध्द,स्वातंत्र्य लढा,तर दख्खन का दरवाजा महाभारताच्या गूढ रहस्यामुळे चांगलाच चर्चेत आहे . यामुळे किल्ल्याला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या दरोरोज वाढत आहे.
सातपुडा पर्वत रांगा मध्ये लांबुनच दिसणारा हा किल्ला इ स १३७० मध्ये असा अहेर नावाच्या शासकाने बसविला होता. आसिरगड किल्ला भारतात सर्वात पुरातन किल्यां पैकी एक असल्याचा उल्लेख अनेक ठिकाणी आहे.आसिरगड किल्याला गेट वे टुडवे म्हणजे “दख्खन का दरवाजा” सुध्दा म्हणतात. ज्या शासकांनी या किल्लावर एक वेळा आपला कब्जा केला. त्यांच्या साठी दक्षिण विजयाच्या द्वार सहज घडले जात होते. यासह देश-विदेशच्या व्यापा-यांशी येथून सहज व्यापर करून आपल्या राज्याची आर्थिक पकड देखील मजबूत करत असत. सुमारे दोनशे वर्ष हा किल्ला फारुखी शासकांकडे होता. त्या नंतर मोगल बादशाह अकबर यांनी हा किल्ला जिंकला.बादशाह अकबर यांना हा आसिरगड किल्ला जिंकायला तब्बल सहा महीने युध्द करावे लागले होते.त्यानंतर आसिरगड किल्या वरील रसद संपल्याने हतबल होऊन बहादुरखान यांनी हा किल्ला बादशहा अकबर यांना दिला होता. हा किल्ला जिंकलामुळे काही दिवस मोगल बादशहा अकबर याच आसिरगड किल्याममध्ये थांबले होते.
दख्खनचा दरवाजा म्हणून ओळख
उत्तर भारतात मुगलांचे सम्राज्य होते .दक्षिणेत कुतुबशहा तर उत्तरेस आदिलशहाचे सम्राज्य होते. तर मध्य महाराष्ट्रात मराठे होते. उत्तर भारतावर आपला वचक ठेवण्यासाठी या आसिरगड किल्ल्यावर विजय मिळविणे आवश्यक असे खान्देशची राजधानी म्हणून सुध्दा आसिरगड किल्ला होत.
मुगल , मराठा , पेशवे व इंग्रजांचा होता रहिवास
असा अहेर नावाच्या शासकाने बसवलेल्या आसिरगडमध्ये अनेक गुप्त रस्ते आकर्षित पायाभरणीत तर जमिनी अंन्तर्गत रस्त्यांची भूल-भुलैया बनविण्यात आला आहे . समुद्र स्तरापासून सुमारे ७५० फूट उंची वर असलेल्या या किल्ल्यावर एक प्रसिध्द मशिद तर पुरातन शिवाचे मंदिर आहे . याच शिव मंदिरात महाभारतातील श्रापीत अश्वत्थामा दररोज येथे येऊन गुलाबाचे फूल शिवपिंडावर चढवून अभिषेक करीत असल्याने अनेकांनी बघितले आहे . या आसिर गड किल्ल्याने मुगोल , मराठा , पेशवे व इंग्रज आदीनी जिंकून येथे रहिवास केल्याचा इतिहास आहे .
आसिर गड किल्ल्याचा असा आहे इतिहास
इ स १६०० ते १७५८ मध्ये मुगोलांच्या ताब्यात खान्देशची राजधानी म्हणून सेवेत होता , परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांना आग्रा भेटीच्या वेळी मोगल बादशाह औरंगजेब यांच्या आदेशा वरुन महाराज बादशाहच्या भेटी आले म्हणून मोगल मुलखात पहीले स्वागताचे पत्र येथेच मिळाले होते.त्यानंतर इ.स.१७६०मध्ये हा किल्ला मराठ्यानी जिंकला त्यानंतर इ.स. १८२१ मध्ये हा किल्ला पेशवेकडे गेला तर १८६९ हा साली किल्ला पासून इंग्रजांकडे होता.
अश्वत्थामा करतात पूजा
महाभारताच्या युध्दा नंतर आचार्य द्रोणाचार्य यांचा पुत्र चिरंजीवी अश्वत्थामा याला श्रीकृष्ण यांनी युगो-युगो पर्यंत भटकण्याचा श्राप दिला होता. आजही अश्वत्थामा सकाळच्या पहार मध्ये येथे येतात. व शिवपिंडाची दरोरोज पूजा करून पुष्प अर्पन करतात किल्याच्या पायथ्याशी असणा-यांनी अनेकांनीअश्वत्थामा यांना पाहीले असून दिसणा-या प्रत्येक व्यक्तीला ते भाकर आणि दूध मागत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.अश्या प्रकारे आसिर गड किल्याचा मोठा इतिहास लाभल्याने हा किल्ला मध्य प्रदेश सह महाराष्ट्रत देखील चर्चेचा विषय ठरत आहे.यामुळे हा किल्ला बघण्याची भाविकांची मोठी उत्सुकता असते.