जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रवादी-काँग्रेस व मित्रपक्षांच्या महाआघाडीचे उमेदवार अभिषेक पाटील आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करत असून त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले आहे.
अभिषेक पाटील यांना कालच राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर झालेली आहे. त्यांनी आपण शुक्रवारी अर्ज भरणार असल्याची माहितीदेखील दिली होती. या पार्श्वभूमिवर, त्यांनी आज सकाळी शहरातील सर्व महत्वाच्या मंदिरांमध्ये दर्शन करून आशीर्वाद घेतले. यानंतर जळगाव जिल्हा काँग्रेस कार्यालयापासून त्यांची उमेदवारी भरण्यासाठीची रॅली निघाली असून या माध्यमातून त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले आहे.
पहा : अभिषेक पाटील यांच्या रॅलीचे थेट प्रक्षेपण.
लिंक : https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/506240196862642/