मुंबई प्रतिनिधी । मंत्रीपदाचा तिढा अखेर सुटला असून सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या यादीला हिरवा कंदील दाखविल्याने आज अखेर खाती जाहीर होणार आहेत.
महाविकास आघाडी मंत्रीमंडळाचा विस्तार झाला असला तरी अद्यापही खाते वाटप करण्यात आले नव्हते. काँग्रेसच्या यादीवर शिक्कामोर्तब होत नसल्याने खाते वाटप रखडले होते. अखेर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आपल्या पक्षाच्या यादीला होकार दिला आहे. यामुळे आज खाते वाटप जाहीर होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या वाट्यातील १० मंत्र्यांच्या खाते वाटपाला रात्री उशिरा मान्यता दिली आहे. त्यानुसार, बाळासाहेब थोरात-महसूल, अशोक चव्हाण-सार्वजनिक बांधकाम, नितीन राऊत-ऊर्जा, अस्लम शेख वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय व बंदरे, वर्षा गायकवाड-शालेय शिक्षण, के.सी.पडवी-आदिवासी विकास, अमित देशमुख-उच्च शिक्षण, सुनील केदार-वैद्यकीय शिक्षण, विजय वडेट्टीवार-दुग्ध विकास व पशुसंवर्धन, यशोमती ठाकूर-महिला व बालकल्याण आदी खाती काँग्रेसच्या वाट्याला आली आहेत. यामुळे ठाकरे सरकारचे आज खातेवाटप होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.