लग्नाचे आमिष दाखवत विवाहितेवर अत्याचार 

पारोळा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवत वेळावेळी अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पारोळा तालुक्यातील एका गावात राहणारी विवाहिता ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ९ मार्च रोजी रात्री ११ वाजता विवाहिता ही झोपडीत झोपलेली असताना संशयित आरोपी डिगंबर मधुकर पाटील हा तिथे येवून तिला लग्नाचे आमिष दाखवत तिचा हात पकडून बळजबरी दुचाकीवर बसून मध्यप्रदेश सेंधवा येथे घेवून गेला तिथे एका ठिकाणी खोलीत सतत आठ दिवस अत्याचार केला. त्यानंतर त्याच्या नातेवाईकांकडे घेवून गेला तिथे देखील तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर मात्र विवाहितेला सोडून संशयित आरोपी डिगंबर पाटील हा पसार झाला. नाही नागरीकांच्या मदतीने विवाहिता घरी आली आणि तिच्यावर घडलेला प्रसंग सांगितला. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात विवाहितेच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी डिगंबर पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव करीत आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!