फैजपूर, ता. यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तिसरे लेवा गणबोली संमेलन धनाजी नाना महाविद्यालयाच्या प्रांगणातील कवयित्री कुसुमताई चौधरी साहित्यनगरी येथे आज सकाळपासून सुरू झाले असून याच्या प्रारंभी भव्य दिंडी काढण्यात आली.
तिसरे लेवागणबोली साहित्य संमेलन आज मंगळवार दिनांक १७ जानेवारी २०२३ रोजी धनाजी नाना महाविद्यालय फैजपूरच्या प्रांगणात होत आहे. हे संमेलन लेवा गणबोली साहित्य मंडळ जळगाव व मधुस्नेह संस्था परिवार यांनी संयुक्तपणे आयोजित केले आहे.
आज सकाळी साहित्यिक व कवी प्राध्यापक भानू चौधरी यांच्या निवासस्थानापासून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून ग्रंथदिंडी काढण्यात आली. यात उपस्थित मान्यवरांनी भाग घेतला. यानंतर कार्यक्रमाचे उदघाटन परतवाडा कॉलेजचे प्राचार्य व भाषा शास्त्राचे अभ्यासक डॉ. काशिनाथ बर्हाटे यांच्या शुभहस्ते करण्यात आले आहे. संमेलनाचे मुख्य आयोजक मंडळाचे सचिव तुषार वाघुळदे तर कार्याध्यक्ष प्रभात चौधरी असून लेवा गणबोलीचे मानबिंदू इतिहासकार, जेष्ठ भाषातज्ञ डॉ.नि.रा.पाटील हे मंडळाचे अध्यक्ष आहेत. प्रमुख अतिथी म्हणून उद्योजक रत्नाकर चौधरी, समाजसेवक व उद्योगपती सुबोधकुमार चौधरी, पीपल्स बँकेचे मा.चेअरमन भालचंद्र पाटील,प्राचार्य प्रमोद चौधरी, सामाजिक कार्यकर्ते अजय बढे , आदी असणार आहेत.
संमेलनात तीन चर्चासत्र ,म्हणजे ( चावयाचावय ),यात लेवा गणबोली यावर डॉ.संजीवकुमार सोनवणे,डॉ.प्रशांत धांडे,प्रा. जतीन मेढे, ओळख बोली भाषांची यावर प्रा.कमल पाटील,डॉ.शकुंतला चव्हाण,डॉ.शोभा नाफडे हे संबोधतील. यावेळी प्रमुख पाहुणे राजेंद्र पाटील,उल्हासनगर असतील.ओळख लेवा गणबोली साहित्यिकांची या सत्रात कुसुमताई चौधरी यांच्या साहित्यावर प्रा.सिंधू भंगाळे, कविवर्य भानू चौधरी यांच्या साहित्यावर संध्या महाजन, रुख्मिणी पाटील यांच्यावर पंकज पाटील हे बोलतील तर कृषीकन्या बहिणाबाईंवर प्रा.डॉ.रुपाली चौधरी हे बोलणार आहेत. माजी संमेलनाध्यक्ष व लेवा गण बोलीचे मानबिंदू जेष्ठ इतिहासकार ,भाषा तज्ञ डॉ.नीलकंठ पाटील,आणि विद्यमान संमेलनाध्यक्ष नाट्यछटाकार अरविंद नारखेडे यांची कवी व आयोजक तुषार वाघुळदे हे प्रकट मुलाखत मुलाखत घेतील. नाट्यछटा सादरीकरणात नीलिमा नेहते,नाशिक ,हर्षल चौधरी सावदा ,लीला गाजरे ठाणे ,कमल पाटील पुणे,राजश्री सरोदे मुंबई यांचा सहभाग असणार आहे. लेवा गणबोलीतील काव्य परोटीचे अध्यक्ष डॉ.अतुल सरोदे असतील.प्रमुख अतिथी म्हणून प्रा.भारती बेंडाळे असतील.
संमेलनाच्या यशस्वीतेसाठी संमेलनाचे कार्याध्यक्ष प्रभात चौधरी, प्राचार्य प्रमोद चौधरी, आयोजक तुषार वाघुळदे, आयोजन समिती सदस्य किशोरी वाघुळदे, संजय पाटील , लिलाधर कोल्हे,ज्योती राणे सुवर्णलता पाटील (डोंबिवली ) तसेच फैजपूर कॉलेजचे प्राध्यापक व कार्यकर्ते कार्यरत आहेत.
लेवा गणबोली काव्य परोटी च्या अध्यक्षस्थानी डॉ.अतुल सरोदे राहतील. यात डॉ. किर्ती गिरीश लोखंडे, हर्षल चौधरी, सुनिता येवले,प्रा. अ. सु. पाटील,संध्या भोळे (बोंडे), पराग पाटील, ललिता टोके, गणेश जावळे, पुष्पा कोल्हे, सुवर्णलता पाटी, डॉ. मिलींद धांडे,डॉ.अतुल सरोदे,निलिमा नेहेते, प्राजक्ता राजेंद्र फेगडे, वंदना सुभाष चौधरी,कुंदा झोपे,कविता लोखंडे, शितल पाटील, डॉ.डिंपल सुरेश पाटील,प्रतिभाग्रज रवी पाटील, प्रल्हाद कोलते, प्रा. वंदना नेमाडे, विनोद इंगळे आदी सहभागी होतील.
मराठी काव्य परोटी हे सत्र तुषार वाघुळदे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे,यात डॉ. विवेक बोंडे, मुंबई प्रा. किसन वराडे,अंबरनाथ बापुराव वाकलकर, जळगाव, डॉ कविता बोंडे, पुणे अरुण वांद्रे, पिंप्राळा; विवेक उपासनी, जळगाव; कुशल दुसाने, जळगाव; मोहन वायकोळे, भोईसर,अशोक पारधे, जळगाव,पुष्पा साळवे, जळगाव; जयश्री काळवीट, भुसावळ,तृप्ती पाटील पालघर ,तुषार वाघुळदे जळगाव, प्रकाश बारी, जळगाव,शैलजा करोडे, मुंबई किशोर पाटील, जळगाव,प्रकाश पाटील, जळगाव,सुरज नेहेते भुसावळ,अशोक शिंदे, जळगांव; के. यू. शेख, जळगाव; इंदिरा जाधव, जळगांव; पुरूषोत्तम पारधे, जळगांव,रेखा मराठे, अमळनेर,वीणा नारखेडे ,राहुल तायडे वरणगाव आदी कवी सहभागी होणार आहेत.