जळगाव, प्रतिनिधी । शहरात गर्दी होऊ नये ठिकठिकाणी महापालिकेकडून पत्रे लाउन सील करण्यात आले आहे. याच प्रमाणे गोलाणी मार्केटजवळ दक्षिणमुखी हनुमान मंदिराजवळ देखील पत्रे लावण्यात आले आहेत. मात्र, हे पत्रे दररोज अज्ञात व्यक्ती काढत असल्याने दुसऱ्यादिवशी या मार्गावरून वाहतूक सुरु होते.
काल महापौर भारतीताई सोनवणे यांनी पाहणी करून आवश्यकता असेल तेथेच पत्रा लावण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत. तसेच नागरिकांची गरसोय टाळण्यासाठी एकेरी मार्ग खुले करण्याच्या सूचना केल्या. याबाबत प्रशासनाने निर्णय घेण्यापूर्वीच गोलाणी मार्केट शेजारील पत्रे काढण्यात आले आहेत. हे पत्रे काढण्यात आल्याने दुचाकीस्वार व चारचाकीधारक या मार्गाचा अवलंब करतांना दिसून येत आहेत. यासंदर्भात उपयुक्त संतोष वाहुळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पत्रे खुले संदर्भात आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असे ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’शी बोलतांना सांगितले.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/615253919122179/