जळगाव (प्रतिनिधी) लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात जळगाव आणि रावेर मतदार संघांसाठी आपल्याकडे उद्या (दि.२३) मतदान होत आहे. सुरक्षित आणि समृद्ध भारतासाठी पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या युवकांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांनी लोकशाहीच्या या उत्सवात मतदानाचा हक्क बजावणे आपले आद्य कर्तव्य आहे. असे आवाहन येथील उद्योजक अशोक जैन यांनी केले आहे.
भारत या जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीआपण सारे मतदार म्हणून घटक असून आज आपण सारे मतदानाचा आपला पवित्र हक्क बजावण्यासाठी सज्ज आहोत. या निवडणूकीत तरुण मतदारांची संख्या लक्षणीय आहे हे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणता येईल.‘१८ वर्षांचे वय केले पार, मिळाला आता मतदानाचा अधिकार’त्यामुळे त्यांनीही मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी पुढे आलेच पाहिजे. पक्षीय राजकारणापलीकडे जाऊन सर्वांगिण विकासाचा ध्यास घेतलेले, कार्य करणारे सक्षम, सुशिक्षित लोकप्रतिनिधी निवडुन देणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. असेही त्यांनी यासंबंधी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.