धरणगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील बालकवी विद्यालयात ‘अटल टिंकरिंग लँब’च्या उद्घाटन प्रसंगी खासदार उन्मेष पाटील आले होते. यावेळी नागरिकांनी त्यांना धरणगाव शहरातील कॉलनीच्या विविध समस्यांचं निवेदन दिलं. निवेदनातील अक्षराकडे पाहत या “सुंदर हस्ताक्षरांसारखी कॉलनी सुंदर बनवू…” असे आश्वासन त्यांनी दिलं
धरणगाव शहरातील कृष्णगीता नगर, जी.एस.नगर, विजय – शांती नगर या कॉलनीतील नगरवासीयांच्या वतीने जिल्ह्याचे खासदार उन्मेशदादा पाटील यांना कॉलनीच्या समस्या जसे रस्ते, पाणी, हायमास लॅम्प अशा विविध विषयासंदर्भात निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी निवेद्न पाहून खासदार उन्मेष पाटील यांनी, “काय सुंदर हस्ताक्षर आहे ! त्याप्रमाणे काँलन्याही सुंदर करू.” असं म्हणत त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले.
सुधाकर मोरे, विनायक कांयदे, सुरेंद्र पाटील, सुशिल भालेराव, महेंद्र सैनी, प्रशांत सुर्यवंशी, पी.डी.पाटील, एस.एन. कोळी, जे.एस.पवार, बी.एम.सैंदाणे, बाळू अत्तरदे, संजय मिस्तरी, बबलू पवार, राजेंद्र चौधरी, नितीन मराठे, उध्दव मोरे, गुलाब भोई, रमेश महाराज, राकेश महाजन, अरूण सोनवणे, गणेश झुंजारराव, गोकुळ महाजन, आदी रहिवासी उपस्थित होते.