एरंडोल प्रतिनिधी । येथील ऐतिहासिक पांडव वाडाची दुरावस्था झाली असून येत्या काळात या वाड्याचे पुर्नवैभव प्राप्त करुन वास्तू संगोपन योजनेत समावेश करण्यात येईल आणि शहरातील वैभवात भर घालणाऱ्या पांडव वाड्याचे गतवैभव प्राप्त करू देऊ, अशी ग्वाही खासदार उन्मेश पाटील यांनी दिली आहे. आज खा.पाटील यांच्यासह विविध पदाधिका-यांनी या स्थळाला भेट दिली.
आज या ऐतिहासिक वाड्यास केंद्राच्या पेट्रोलियम प्राकृतिक गॅस तसेच सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्रालयाचे स्टँडिंग कमिटी सदस्य खासदार उन्मेश पाटील यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी नगराध्यक्ष रमेश परदेशी, माजी नगरसेवक जगदीश ठाकूर, भाजप शहराध्यक्ष निलेश परदेशी, भरत महाजन, सामाजिक कार्यकर्ते सचिन विसपुते, रवींद्र पाटील, शंतनू भेळसेकर, मयूर ठाकूर, अमोल भावसार, भोला महाजन, पिंटू सोनार, रवींद्र पाटील, शुभम मोराणकर, किशोर पाटील कुंझरकर, मयूर बिर्ला, राजेश शिंपी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.