भुसावळात लेडीज रनच्या प्रशिक्षण पर्वास प्रारंभ ; उत्स्फूर्त प्रतिसाद

भुसावळ – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनतर्फे 27 मार्च रोजी आयोजित लेडीज इक्वलिटी रनच्या प्रशिक्षण व सराव शिबिरास रविवार दि. 6 मार्च रोजी मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

महिला क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा आरती चौधरी व सहभागी धावपटू रूपा अग्रवाल यांच्या हस्ते नारळ फोडून सकाळी 6.00 वाजता विधिवत प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रवीण फालक उपस्थित होते.

यावेळी फालक सर यांनी धावण्याच्या आधी करावयाचा वॉर्मअप, धावताना आपण कुठली काळजी घ्यावी व धावल्यानंतर आवश्यक असलेली स्ट्रेचिंग एक्झरसाइज याविषयी मार्गदर्शन केले. आरती चौधरी यांनी या रनमध्ये आपण स्वतः नाव नोंदणी केली असून अधिकाधिक महिलांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केले.

रूपा अग्रवाल यांनी अशा प्रकारचा रन आयोजित केल्याबद्दल भुसावळच्या सर्व महिला धावपटूंचे विशेष आभार मानले.

याप्रसंगी लेडीज रनच्या संयोजिकाद्वय डॉ. नीलिमा नेहेते व डॉ. चारुलता पाटील यांनी लेडीज रनबद्दल प्राथमिक माहिती दिली.

सर्वप्रथम वॉर्मअप एक्झरसाइजनंतर प्रत्यक्ष धावायला सुरुवात झाली. धावताना भुसावळच्या अनुभवी महिला धावपटू नव्याने सहभागी महिलांना धावण्याचे विविध बारकावे सांगत होत्या व इजा टाळण्यासाठी मार्गदर्शन करीत होत्या. त्यानंतर स्ट्रेचिंग एक्झरसाइज घेण्यात आली.

27 मार्च रोजी आयोजित या रनमध्ये आतापर्यंत 200 महिलांनी नावनोंदणी केली असून कोरोना नियमांमुळे यावर्षी मर्यादित स्वरूपात हा रन घेणार असून लवकर नावनोंदणी करावी असे आवाहन यावेळी योगशिक्षिका पूनम भंगाळे, डॉ. स्वाती फालक, पूजा बलके, झुंबा ट्रेनर पारुल वर्मा, नीलांबरी शिंदे, मीना नेरकर,सुवर्णा पाटील, प्रिया पाटील, सीमा पाटील, डॉ.शितल चोरडिया, चारुलता अजय पाटील, सरला पाटील, हर्षा लोखंडे, ममता ठाकूर या महिला सदस्यांतर्फे करण्यात आले.

आज रोजी आयोजित 3 ते 5 किमीच्या रनमध्ये 52 महिलांनी सहभाग नोंदविला. यामध्ये डॉ. संज्योत पाटील, आराधना तांबे, छाया चौधरी, चित्रा करकरे, भावना झा सिंग, डॉ. वर्षा वाडीले, इंदिरा सोनगिरे, सुनिता वाघमारे, मंगला पाटील, भावना देशमुख, सरला कोल्हारकर, रिया कोलारकर या महिला स्पर्धकांनी यशस्वी सहभाग नोंदविला.

Protected Content