देऊळवाडा येथे बिबट्याचा हल्ला; तीन जण जखमी ( व्हिडीओ )

Bibtya

जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील देऊळवाडा येथे आज सकाळी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात तीन जण जखमी झाले आहेत. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, गावातील नागरिकांसह वनविभागाचे कर्मचारी परिसरात बिबट्याचा शोध घेत आहेत.

 

या संदर्भात अधिक असे की, तालुक्यातील देऊळवाडा येथील शेतकरी प्रमोद संजय सोनावणे (वय २०) हे आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास आपल्या शेतात पाणी पिकाला भरण्यासाठी गेले होते. त्यावेळी शेतात काही कुत्रे भुंकत असल्याचे त्यांना दिसून आले. कुत्रे का भुंकताय? हे बघण्यासाठी प्रमोद सोनावणे हे शेतात थोडे आत शिरले असता त्यांच्यावर बिबट्याने अचानक हल्ला केला. बिबट्याने त्यांच्या पाठीवर हातावर पंजाने जोरदार वार केले. त्यानंतर बिबट्याने थेट गळ्याकडे झेप घेतली. परंतु प्रमोद सोनावणे यांनी आपल्या जखमी डाव्या हाताने स्व:ताचा बचाव केला. त्यांनतर बिबट्याने तेथून पळ काढला. प्रमोद सोनावणे यांनी तात्काळ फोन लावून गावातील लोकांना घटनेची माहिती दिली. थोड्याच वेळात शेकडो लोकांचा जमाव शेताच्या दिशेने धावून आला. त्यानंतर नागरिकांनी बिबट्याचा शोध सुरु केला असता, तो पुढील एका शेतात लपून असल्याचे लक्षात आले. यावेळी देवचंद लक्ष्मण सोनावणे(वय ५७) यांच्यावर बिबट्याने हल्ला करत पुन्हा पळ काढला. घटनास्थळी वनविभागाचा एक कर्मचारी देखील किरकोळ जखमी झाल्याचे कळतेय. दरम्यान, परिसरात बिबट्याचा कसून शोध सुरु आहे.

Add Comment

Protected Content