जळगाव प्रतिनिधी । शिवाजी नगर उड्डाणपुलाचे काम सुरू झाल्यापासून वाहतूकीच्या कोंडी अजूनही सुरूच आहे. रेल्वे प्रशासनाच्या अंतर्गत असलेल्या लेंडी नाल्यावरील पूलाचे काम पुर्ण जरी झाले असले तरी महानगरपालिकेच्या ताब्यातील रोडचे काम अजूनही बाकी आहे. त्यामुळे शिवाजी नगरातील नागरीकांना हा रस्ता अजून खुला झालेली नाही.
रेल्वे प्रशासनाच्या ताब्यातील पुलाचे काम पुर्ण झाले आहे. यामुळे आता वाहनचालकांसह नागरीकांना दिलासा मिळाला आहे. मात्र तरीही महापालिकेच्या अखत्यारितील पुलाचे काम अजूनही अपुर्ण असल्याने दुचाकी वाहनधारकांना कांचननगरातून शहरात येण्याचा मार्ग आहे तर चार चाकी वाहनांसाठी जैनाबादकडून जाण्याचा रस्ता आहे. रेल्वे पुलाचे मुख्य काम झाले असले तरी शनिपेठ आणि चौघुले प्लॉटकडून जाण्यासाठीचा रस्ता पुढे अडचणीचा असल्याने वाहनधारक परत जात अाहे.
महानगरपालिकेच्या अखतरितील मधील काम अजून बाकी असल्याने रहदारीचा मार्ग मोकळा होण्यास अडचण आहेच. महापालिकेच्या या कामांसाठी किमान एक महिन्याचा कालावधी लागू शकतो असे चित्र रस्त्यांच्या परिस्थितीतून जाणवत आहे. पावसाळ्यात लेंडी नाल्याला पुर येत असल्याने वेळेत रस्त्याचे काम झाले नाही तर पावसात नागरीकांसह महापालिकेला मोठा फटका बसणार आहे.