यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी लागुन असलेल्या डोंगरदा या आदिवासी पाड्यावर वनविभाग व तालुका विधी सेवा समितीच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
आज रविवार दि. २ ऑक्टोबर २०२२ रोजी यावल न्यायालयात न्यायदंडाधिकारी मनोज बनचरे आणि न्या .विनोद डामरे तसेच यावल वनविभागाच्या पुर्व वनपरिक्षेत्र चे अधिकारी विक्रम पदमोर, यावल तालुका विधी सेवा समिती चे पदाधिकारी ॲड. एम. पी. मोरे, अॅड. अशोक सुरळकर, अॅड. अजय कुलकर्णी आणि न्यायालयीन कर्मचारी यांच्या उपस्थितीत राहून राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्री यांच्या जयंती निमित्ताने त्यांच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात आले.
या वेळी सकाळच्या सत्रात न्यायालयाच्या परिसर साफ सफाई करीत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्यानंतर यावल तालुक्यातील मौजे- डोंगरदे या आदिवासी पाड्यावर दि.१ ऑक्टोंबर ते ७ ऑक्टोंबर या कालावधीत वन्यजीव सप्ताह निमित्त यावल वनविभाग आणि यावल तालुका विधी सेवा समिती यांचे संयुक्तरीत्या कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. या कार्यक्रमात वन्यजीव संरक्षण, मानव व वन्यजीव संघर्ष, कौटुंबिक कायदे, न्यायालयीन कामकाज, दैनंदिन जीवनातील नियम, कायदेविषयक मार्गदर्शन डोंगरदे ग्रामस्थांना करण्यात आले. हे मार्गदर्शन यावल कोर्टाचे न्यायधीश एम. एस . बनचरे आणि न्या. विनोद डामरे,यावल वनपरिक्षेत्र अधिकारी विक्रम पदमोर आणि ॲड. एम. पी. मोरे, अॅड. अशोक सुराळकर, अॅड. अजय कुलकर्णी यांनी केले. आभार डोंगरदे येथील जिरबान पावरा यांनी मानले. याप्रसंगी वनपाल रवि तायडे , वन संरक्षण समिती अध्यक्ष गंगाधर तायडे , वनरक्षक कॄष्णा शेळके, गोवर्धन डोंगरे, निंबा पाटील, प्रकाश बारेला, तुकाराम लवटे,जिवन नागरगोजे,गणेश चौधरी,नंदलाल वंजारी, सचिन चव्हाण,पुंडलिक पाटील, युवराज पावरा, बागुल, घारु,अमिरा पावरा, जेलु पावरा, कुरबान पावरा ,संतोष भिलाला आदी ग्रामस्थ उपस्थितीत होते.