यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्हा विधी सेवा प्राधीकरणच्या अंतर्गत यावल तालुका विधी सेवा समितीतर्फे यावल पंचायत समिती कार्यालयात कायदेविषयक मार्गदर्शन शिबीरात न्यायमुर्ती एम.एस.बनचरे यांच्या उपस्थितीत पार पडले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्यायमुर्ती एम.एस.बनचरे हे होते तर प्रमुख मार्गदर्शक वक्ते म्हणुन निवासी नायब तहसीलदार आर.के. पवार, गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड-बोरसे, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी किशोर सपकाळे, महीला व बालविकास कार्यालयाच्या प्रभारी अर्चना आटोले, संजय गांधी निराधार समिती विभागाच्या नायब तहसीलदार बबीता भुसावरे, अॅड.डी. आर. बाविस्कर, अॅड.अशोक सुरळकर यांच्यासह आदी मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते.
यावेळी न्या. एम.एस .बनचरे यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, गरजू लोकांना मोफत कायदेशीर मदत व सरकारी खर्चाने न्याय मिळवुन देणे , मध्यस्थता केन्द्रा मार्फत आप आपसातील वाद समोपचाराने सोडविणे , महीलांच्या विविध कायदेशीर अधिकारी व त्यांच्यावरील होणारे लैंगिक शोषण व गर्भलिंग निदान प्रतिबंधक्र कायद्याविषयी तसेच बेटी बचाव बेटी पढाव या योजनेचे प्रसार प्रचार करण्याचा मुद्दा मांडला.
यावेळी निवासी नायब तहसीलदार आर.के. पवार, गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी किशोर सपकाळे यांनी उपस्थितांना शासकीय योजनेचा लाभ मिळवाया विषयी व पर्यावरणाचे समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड यांच्यासह आदी महत्वाच्या विषयांची सविस्तर माहीती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन यांनी केले तर उपस्थितांचे आभार निवासी नायब तहसीलदार आर.के. पवार यांनी मानले.