इकरा थीम महाविद्यालयात करियर कट्टातर्फे व्याख्यानमाला

जळगाव प्रतिनिधी । येथील इकरा शिक्षण संस्था संचलित थीम कला व विज्ञान महाविद्यालयात करियर कट्टातर्फे व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते.

करियर कट्टातर्फे नंदकिशोर काळे इंडियन फॉरेस्ट सर्विस उपसंचालक ताडोबा वन विभाग चंद्रपूर यांचे स्पर्धात्मक परीक्षेची पूर्वतयारी तसेच डॉक्टर गणेश रोकडे जालना महाविद्यालय गणित व उच्च शिक्षणात रोजगाराच्या संधी, जाफर शेख पिंच बॉटलींग कंपनी चे संचालक यांनी व्यवसाय धोरणाची मूलभूत तत्वे या विषयावर इ- व्याख्यान संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य पिंजारी आय.एम. होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शेख इरफान बशीर यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय डॉ. राजू गवारे, डॉक्टर तन्वीर खान यांनी केले. प्रमुख वक्ता नंदकिशोर काळे मार्गदर्शन करताना म्हटले की प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या जीवनाचे लक्ष्य निश्चित करावे. स्पर्धात्मक परीक्षेकरिता विद्यार्थ्यांनी सम सामायिक घटनांचा अभ्यास करावा. तसेच डॉक्टर गणेश रोकडे यांनी आपल्या व्याख्यानात म्हटली की उच्च शिक्षण घेतल्यानंतर भरपूर रोजगाराच्या संधी उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण थांबू नये. अवांतर वाचन करावे रोज वर्तमान पत्र वाचावे. तसेच जफर शेख यांनी व्यवसाय धोरणांची मूलभूत तत्वे विद्यार्थ्यांना पटवून दिली.

कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता डॉ. इरफान शेख, डॉ. राजू गवारे, डॉ. राजेश भामरे, डॉ. युसुफ पटेल, डॉ. तनवीर खान, डॉ. सदाशिव दापके डॉक्टर ऑफिस शेख प्राध्यापक उमर पठाण यांनी परिश्रम घेतले.

 

 

 

Protected Content