लेखी आश्‍वासनाशिवाय बंदमधून माघार नाहीच- व्यापार्‍यांचा पवित्रा

जळगाव प्रतिनिधी । कृषी उत्पन्न बाजार समितीने लेखी आश्‍वासन दिल्याशिवाय बंदमधून माघार न घेण्याचा पवित्रा आज व्यापार्‍यांनी घेतला आहे.

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापारी संकुलाचा वाद चिघळला आहे. संबंधीत ठेकेदाराने शनिवार भिंत तोडून कामाला सुरवात करण्याची तयारी केली. याला प्रतिकार करून व्यापार्‍यांनी सोमवारपासून बंद पुकारला आहे. यानुसार काल बंद पाळण्यात आला. रात्री उशीरा बाजार समितीमधील सत्ताधार्‍यांनी पत्रकार परिषद घेऊन माघार घेत या प्रकरणावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला. त्यांनी संबंधीत ठेकेदाराला पाडलेली भिंत पुन्हा बांधून देण्याचे निर्देशदेखील दिले. तथापि, व्यापार्‍यांनी मात्र अजूनही आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवला आहे.

आज सकाळी बाजार समितीमधील व्यापार्‍यांची बैठक झाली. यात कृषी उत्पन्न बाजार समितीने लेखी आश्‍वासन दिल्याशिवाय बंद मागे न घेण्यावर एकमत करण्यात आले. यामुळे आता हे प्रकरण पुन्हा एकदा चिघळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, ही बैठक झाल्यानंतर व्यापारी माजी मंत्री सुरेशदादा जैन यांची भेट घेण्यासाठी गेल्याचे वृत्त आहे.

Add Comment

Protected Content