यावल महाविद्यालयात सिव्हिल इंजिनिअरिंग विषयावर व्याख्यान

यावल प्रतिनिधी । येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सिव्हिल इंजिनिअरिंग या विषयावर प्राध्यापक प्रबोधिनीचे पाचवे पुष्प शेखर चव्हाण यांनी गुंफले असून अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार होते.

सदर कार्यक्रम प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आला. याप्रसंगी  शेखर चव्हाण यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, आपल्या देशाच्या विकासासाठी व जळण घळ्णात साठी इंजिनीअरिंगचा खूप फायदा होतो. या क्षेत्रात नोकरीच्या, व्यवसायाच्या विविध संधी उपलब्ध आहेत.या क्षेत्रात काही फायदे व काही तोटे सुद्धा असल्याची माहिती चव्हाण यांनी आपल्या मार्गदर्शन भाषणातुन दिली.

अध्यक्षीय मनोगतात प्रा. एम. डी. खैरनार यांनी प्रतिपादन केले की, या क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान आणि वेगवेगळ्या शाखा निर्माण झालेल्या आहे. या क्षेत्रात कल्पकतेला व नवनिर्मितीला मोठी संधी आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  मनोज पाटील यांनी केले तर आभार पी. आर. पाटील यांनी मानले. सदर उपक्रमास सर्व उपप्राचार्य प्रा. ए. पी. पाटील,  संजय पाटील, प्रा. एस. आर. गायकवाड व सर्व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.

 

Protected Content