मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महापालिकांच्या पाठोपाठ आता राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या आरक्षणाची सोडत दि. १३ जून रोजी जाहीर करण्यात येणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे.
ओबीसी आरक्षणामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका खोळंबल्या असतांना राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. या अनुषंगाने काही दिवसांपूर्वी महापालिका आरक्षणांची सोडत जाहीर करण्यात आली होती. यानंतर आता आगामी नगरपालिका आणि नगरपंचायतींची सोडत जाहीर करण्यात येणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने याची घोषणा केली असून यानुसार १३ जून रोजी आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे. यामुळे या आरक्षणातून नगराध्यक्षपद हे नेमके कोणत्या प्रवर्गासाठी राखीव आहे हे स्पष्ट होणार आहे.