Home Cities अमळनेर स्वामी हंसानंद तीर्थ श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येसाठी रवाना

स्वामी हंसानंद तीर्थ श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येसाठी रवाना


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अखिल भारतीय संत समीती निर्देशक मंडळ चे सदस्य तथा अमळनेर तालुक्यातील श्री क्षेत्र कपिलेश्वर मंदीर संस्थानचे अध्यक्ष,मठाधीपती महामंडलेश्वर स्वामी हंसानंद तीर्थ जी महाराज यांना अयोध्या नगरीत रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा साठी राम मंदिर ट्रष्ट अयोध्या कडून निमंत्रन पत्र प्राप्त झाले.

त्या अनुषंगाने महाराज अयोध्या कडे मार्गस्थ झाले आहेत. प्रयाण करतांना महाराजांचे मंदीर संस्थान कडून तसेच,रस्त्याने लागणारे निम, कळमसरे, मारवड, धार,अमळनेर येथे ग्रामस्थ व भावीकांकडून स्वागत करण्यात आले.

अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासारख्या महत्वाच्या आयोजनात हंसानंद तीर्थ यांना थेट आमंत्रण आल्याची बाब लक्षणीय असून यामुळे त्यांच्या भक्त परिवारात आनंदाचे वातावरण निर्मित झाले आहे.


Protected Content

Play sound