चाळीसगाव प्रतिनिधी । एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेशाचे संकेत दिल्यानंतर भाजपला गळती सुरू झाली असून याचा प्रारंभ चाळीसगाव व भडगावातून झाला आहे.
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी राजीनामा दिल्यानंतर कैलास सूर्यवंशी यांनी त्यांच्या सोबत जाण्याचे जाहीर केले आहे. सूर्यवंशी हे नाथाभाऊंचे कट्टर समर्थक मानले जातात. स्थानिक पातळीवर खासदार उन्मेष पाटील व आमदार मंगेश चव्हाण यांच्यापासून त्यांनी कायम अंतर राखलेले होते. या पार्श्वभूमिवर, त्यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत आपण खडसे यांच्यासोबत असल्याचे जाहीर केले आहे. याच्या सोबत भडगाव तालुक्यातील माजी जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील यांनी सुध्दा नाथाभाऊंच्या सोबत जाण्याचे घोषीत केले आहे. तर माजी प्रदेश पदाधिकारी सतीश दराडे यांनी देखील हीच भूमिका घेतली आहे.