जळगाव, प्रतिनिधी । गाळ्यावरील कराची रक्कम कमी करून देण्यासाठी 4 हजार रुपयांची लाख स्वीकारताना महापालिका कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. विलास भिका पाटील (वय 55) असे या कर्मचाऱ्याचे नाव असून, आज त्याला जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आल्यावर न्यायालयाने एक दिवसाच्या पोलिस कोठडीत रवाना केले आहे.
शहरातील पिंप्राळा परिसरातील सानिका टॉवर व्यापारी संकुलातील गाळेधारक गोपाळ भिका पाटील याच्या दुकानाचे कर कमी करुन देण्याच्या बोलणीवर मनपा कर्मचारी (चौकीदार) विलास पाटील याने लाचेची मागणी केली होती. दुकानदाराने त्याला होकार देत या संदर्भात लाचलुचपत विभागाच्या कार्यालयात धाव घेतली. मंगळावार (ता.19) रोजी तक्रादाराकडून 4 हजारांची लाच घेतांना पथकाने त्याला रंगेहाथ अटक केली होती. आज विलास पाटील याला जिल्हा न्यायालयात न्या.आर.जे.कटारीया यांच्या न्यायालयात हजर केल्यावर कोठडीची मागणी केल्यावर न्यायालयाने त्यास 1 दिवसांच्या कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले आहे. सरकार पक्षाने 1 दिवसांच्या कोठडीत रवाना करण्याचे आदेश दिले. सरकारपक्षातर्फे ॲड.मोहन देशपांडे यांनी कामकाज पाहिले.