Home Cities जळगाव बाजार समिती सभापती लक्ष्मण पाटलांचा राजीनामा

बाजार समिती सभापती लक्ष्मण पाटलांचा राजीनामा

0
31

जळगाव प्रतिनिधी । अविश्‍वास प्रस्तावाला सामोरे जाण्याआधीच आज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती लक्ष्मण पाटील उर्फ लकी टेलर यांनी राजीनामा दिला आहे.

लक्ष्मण पाटील उर्फ लकी टेलर यांनी सभापतीपदासाठी झालेल्या बोलणीनुसार कालखंड उलटून गेल्यानंतरही राजीनामा न दिल्याने त्यांच्या विरूध्द १५ संचालकांनी अविश्‍वास प्रस्ताव दाखल केला होता. यानंतर लकी टेलर यांनी थेट ना. गुलाबराव पाटील यांच्यावर आरोप करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती. त्यांनी आपण राजीनामा देणार असल्याचे सांगितले तरी राजीनामा दिला नव्हता. यामुळे राजकीय क्षेत्रात तर्क-वितर्क लढविण्यात येत होते. अखेर त्यांनी आज माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्याकडे आपला राजीनामा सुपुर्द केला. याप्रसंगी सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील व काही संचालकांची उपस्थिती होती. यामुळे लकी टेलर यांनी सामोपचाराची भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, आता नवीन सभापती व उपसभापतीपदी कुणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound