हिंगोणा येथे “माझे कुटुंब माझी जबाबदारी” अभियान अंतर्गत सर्वेक्षण मोहिमेला सुरुवात

यावल प्रतिनिधी । नुकतेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या संकल्पनेतुन माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेस महाराष्ट्रात सुरुवात करण्यात आली आहे. आज प्रा.आ. केंद्र हिंगोणा अंतर्गत न्हावी गावात जि.प.सदस्य प्रभाकर ना. सोनवणे, प.स.सदस्य सरफराज तडवी, ग्रा.पं.सदस्य मिलिंद महाजन, वैद्यकीय अधिकारी डॉ.अभिषेक ठाकुर, यांच्या प्रमुख उपस्थितित मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. 

मोहिमेच्या सरुवातीस जि.प.सदस्य प्रभाकर सोणवने  व वैद्यकीय अधिकारी डॉ.अभिषेक ठाकुर यांनी न्हावी गावातील ग्राम पंचायत कार्यालयात सिस्टर, ब्लॉक फेसिलेटर, आशा वर्कर्स यांची मिटिंग घेऊन सदरील मोहिमेची माहिती देत करोणा नियंत्रण करण्याकरीता योग्य त्या उपायोजना करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले.  त्यानंतर न्हावी गावातील घरोघरी जाऊन सिस्टर्स व आशा वर्कर च्या माध्यमातुन सर्वेक्षणास सुरुवात करण्यात आली. यात कुटुंब, परिवार, गाव, शहर आणि राष्ट्र हितार्थ फेस मास्कचा वापर करणे, शारीरिक आंतराचे पालन करणे,वारंवार हात धुणे, कमीत कमी प्रवास करणे या बाबत प्रत्येक कुटुंबातील सदस्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी डॉ.अभिषेक ठाकुर हे जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा साथरोग अधिकारी यांच्यासोबत जिल्ह्याच्या वॉर रुम च्या कामकाजात सक्रीय सहभाग घेऊन , जि.परीषदच्या बाह्य रुग्ण विभागाचे कामकाज सांभाळत हिंगोणा-फैजपुर येथे अहोरात्र देत असलेल्या रुग्णसेवेचा गौरव करत, आजतागायत त्यांनी हजारो रुग्णांचे स्वैब घेऊन त्यांना दिलेले जिवदान हे प्रशंसनीय आहे अशा शब्दांमध्ये जि.प.सदस्य आप्पासो प्रभाकर नारायण सोणवने यांनी त्यांचा गौरवपर उद्गार केला.

तसेच लोकप्रतिनीधींनी त्यांना साथ द्यावी असे आव्हाहन केले यावेळी त्यांच्यासमवेत प.स.सदस्य तसेच जि.प.सदस्य सोनवणे, सरफराज तडवी, ग्रा.प.सदस्य मिलिंद महाजन, वैद्यकीय अधिकारी डॉ.अभिषेक ठाकुर, आरोग्य सेवक विलास महाजन, आ.सेविका के.टि.पाटिल, कैलास कोळी, ब्लॉक फेसिलेटर, आशा वर्कर्स व गावातील प्रतिष्ठीत नागरीक उपस्थित होते.

Protected Content