‘एक कॉल मदतीचा : संवाद आपुलकीचा’ अभियानाचा शुभारंभ

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । सर्वच स्तरातील नागरिकांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यातून मार्ग काढण्यासाठी मदत व सहकार्य करण्याच्या हेतूने जळगाव जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य रविंद्र पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘एक कॉल मदतीचा : संवाद आपुलकीचा’ अभियानाचा शुभारंभ नुकताच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते पार पडला.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेष्ठनेते एकनाथराव खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात येणार असल्याचे रविंद्र पाटील यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, जळगाव जिल्ह्याचे निरिक्षक अविनाश आदिक, माजी पालकमंत्री डॉ. सतिश पाटील, माजी पालकमंत्री तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष रोहिणी खडसे यांच्यासह जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शरदचंद्र पवार यांनी या अभियानाबद्दल रविंद्र पाटील यांचे कौतुक करत अभिनंदन केले आणि त्यासाठी शुभेच्छा दिल्या.

असे असेल अभियान :-

‘एक कॉल मदतीचा : संवाद आपुलकीचा’ या अभियानांतर्गत ‘एक कॉल मदतीचा’ यात सोमवार ते शुक्रवार सकाळी 11 ते 5 वाजेदरम्यान 7757074980 अथवा 02582 299773 यावर संपर्क साधायचा असून विविध विभागांशी संबंधित समस्या सांगायच्या आहेत. त्यानंतर या अभियानात काम करणारे स्वयंसेवक या समस्यांसंदर्भात संबंधित विभागांशी संपर्क साधून ते काम पूर्ण करण्यासाठी अथवा समस्या निराकरणासाठी मदत व सहकार्य करतील. या अभियानामुळे नागरिकांना एका कॉलवर आपल्या अडचणी सुटण्यासाठी मदत मिळणार आहे. तसेच ‘संवाद आपुलकीचा’ यात दर सोमवारी सकाळी 09 ते 01 या वेळेत भुसावळ येथील नवशक्ती आर्केडमधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संपर्क कार्यालयात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य रविंद्र पाटील स्वतः उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधणार आहेत. जेणेकरून नागरिकांशी संपर्क, त्यांच्या अडीअडचणी, भविष्यात करावयाची कामे, पक्ष संघटन, विविध कार्यक्रमांचे आयोजन यासंदर्भात चर्चा करता येणे शक्य होणार आहे.

विविध या कार्यालयातून आपले काम पूर्ण करून घेण्यासाठी वेळोवेळी चकरा मारणे आणि धावपळ करणे यातून सुटका होण्याचा एक महत्त्वाचा मार्ग राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे ‘एक कॉल मदतीचा : संवाद आपुलकीचा हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाचे खुद्द शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यासह वरिष्ठांनी कौतुक केले आहे. नागरिकांनी या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जळगाव जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य रविंद्र पाटील यांनी केले आहे.

 

Protected Content