मांडळ येथे जलयुक्त शिवार योजनेंतर्गत भाला नाला खोलीकरणाचा शुभारंभ

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मांडळ येथे जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत भाला नाला खोलीकरनाचा शुभारंभ आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या शुभहस्ते नुकताच करण्यात आला.अमळनेर तालुक्याचे जलयुक्त शिवार योजनेचे अध्यक्ष असलेल्या आ.चौधरींच्या प्रयत्नांनी तालुक्यातील जलसंधारणाच्या कामासाठी मुबलक निधी उपलब्ध झाल्यामुळे निश्चितच सिंचनाचे प्रमाण वाढेल अशी भावना तालुका कृषी अधिकारी बी.व्ही.वारे यांनी व्यक्त केली. यावेळी आ. चौधरींचा या कामगिरीबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.

जलयुक्त शिवारचे अध्यक्ष या नात्याने मागील वर्षी देखील आ.चौधरी यांनी मोठया प्रमाणात निधी आणल्याने जिल्ह्यात सर्वाधिक नालाखोलीकरणाची कामे अमळनेर तालुक्यात झाली. एवढेच नव्हे तर,जेथे शासकीय निधी अपूर्ण पडला तेथे हिरा उद्योग समूहाच्या सीएसआर फंडातून नालाखोलीकरणाची कामे करण्यात आली. परिणामी बऱ्याच गावांना पाणी अडवले जाऊन त्याचे फलित दिसून आले. परंतु पाहिजे त्या प्रमाणात वरून राजाची कृपा न झाल्याने तालुक्याचे समाधान होऊ शकले नाही. तरीही यंदा आ.चौधरी यांनी मोठा निधी पदरात पाडून जलयुक्तची कामे सुरू ठेवली आहेत. त्यामुळे त्याचे फलित मोठ्या प्रमाणात दिसेल, असा आशावाद व्यक्त होत आहे. भाला नाला खोलीकरणामुळे मोठया प्रमाणात पाणी अडविले जाऊन पांझरा काठावरील सिंचन क्षमता वाढून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील सुटणार आहे. यावेळी तालुका कृषी अधिकारी बी.व्ही.वारे, मंडळ अधिकारी प्रदीप निकम, मंडळ अधिकारी वाय.ऐ. बोरसे, कृषी पर्यवेक्षक ए. एस खैरनार, राजेश बोरसे, कृषी सहायक राजेश बोरसे, योगेश कदम, सरपंच राजेंद्र पाटील, वि.का.सो.चे व्हाइस चेअरमन मुडी बाळासाहेब सदांनशीव, सुनील भामरे, पंकज चौधरी, सरपंच मनोहर पाटील, उपसरपंच संजय भिल, माजी सरपंच नारायण कोळी, विनायक पंडित बडगुजर, अशोक लखा कोळी, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी उपसभापती अशोक हिम्मतराव पाटील, रतिलाल पाटील, विजय पाटील, अण्णा पारधी, माजी उपसरपंच कैलास कोळी, उमेश कोळी, रमेश पाटील, काशिनाथ बडगुजर, उत्तम वानखेडे, सूरेश कोळी, रुस्तम खाटीक, शशांक सदानशिव, विजेंद्र शिरसाळे, व ग्रामस्थ उपस्थित होते.

Add Comment

Protected Content