जामनेरात स्व.सुरेश पाटील चषक क्रिकेट स्पर्धा संपन्न

जामनेर प्रतिनिधी | जामनेर येथे आयोजित या स्व.सुरेश पाटील चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या. यात एक लाख रुपयाचे प्रथम ‘स्वराज व्हायरस क्रिकेट संघ, भुसावल’ तर पन्नास हजार रुपये द्वितीयाचे परितोषिक ‘गुड्डू इलेव्हन क्रिकेट संघ, सिल्लोड’ यांनी प्राप्त केले.

शहरात तुषार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रथमच दिनांक १ ते ५ डिसेंबर दरम्यान ‘स्व.सुरेश पाटील चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा’ संपन्न झाल्या. या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन जामनेर शहराच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा साधना महाजन, गटनेते डॉ.प्रशांत भोंडे, राष्ट्रवादीचे नेते संजय गरुड, प्रमोद पाटील, तुषार पाटील, अमोल पाटील, राजेंद्र पाटील आणि अमर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

जामनेर शहरातील हिवरखेडा रोडवरील गोविंद महाराज संस्थान पटांगणावर तुषार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त स्वर्गीय सुरेश पाटील टेनिस बॉल चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. पहिल्यांदाचं आयोजित केलेल्या या स्पर्धेत जामनेर, भुसावळ, औरंगाबाद, सिल्लोड, बुलढाणासह राज्यभरातून सुमारे 33 संघ सहभागी झाले.

पाच दिवस चाललेल्या या स्पर्धेची फायनल रविवार, दिनांक 5 डिसेंबर रोजी संपन्न झाली. विजेता संघ आणि खेळाडूंना तुषार पाटील, श्रीराम पाटील, अमर पाटील, राजेंद्र पाटील, डॉ.प्रशांत भोंडे, सुहास पाटील, भूषण पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते चषक व रोख रकमेची पारितोषिक देऊन अभिनंदन करण्यात आले.

यावेळी उत्कृष्ट फलंदाज, मालिकावीर, उत्कृष्ट गोलंदाज या खेळाडूंना प्रत्येकी २,१०० रुपये पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. जामनेर शहरासह तालुक्यात पहिल्यांदाच अशाप्रकारे टेनिस बॉल चषक क्रिकेट स्पर्धा भरवण्यात आल्यामुळे खेळाडूंना या माध्यमातून एक व्यासपीठ मिळाले त्यामुळे खेळाडूंमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.

Protected Content