भुसावळ प्रतिनिधी । हिंदी सेवा मंडळाचे तत्कालीन सचिव स्वर्गीय देवीप्रसाद शर्मा यांचे सातवे पुण्यस्मरण निमित्ताने त्यांनी शैक्षणिक, साहित्यिक व सामाजिक चळवळीत दिलेल्या योगदानाच्या आठवणी आज ११ नोव्हेंबर २०२० रोजी श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात मान्यवरांनी जागविल्या.
शिक्षण क्षेत्रातील त्यांचे काम उल्लेखनीय आहे. आयुष्यभर सर्वांना शिक्षण मिळावे. केजी टू पीजी शिक्षण प्रणालीसाठी त्यांनी काम केले. समान, गुणवत्तापूर्ण शिक्षण यासाठी ते कायम आग्रही असायचे. शिक्षणातील वेगवेगळ्या प्रश्नांवर ते कायम पुढे असायचे. हिंदी सेवा मंडळच्या माध्यमातून शैक्षणिक दर्जा उंचाविण्यासाठी भरीव कार्य केले आहे. ते शेवटपर्यंत सक्रिय होते. पण, दुर्देवाने ते आपल्यातून निघून गेले, प्रतिकुल परिस्थितीचा सामना करून लक्ष साध्य करणारा थोर योद्धा म्हणून त्यांची ख्याती होती, समाजात आजही एक उत्तम प्रशासक म्हणून भैय्याजी ओळखले जातात असे अभिवादन कार्यक्रमादरम्यान श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह म्हणाले. सोशल डिस्टनचे पालन करीत कार्यक्रम घेण्यात आला.
भैय्याजी समाजाने एक अभ्यासू व्यक्तिमत्व गमावले. त्यांनी त्यांचे जीवन आदर्श मूल्यांसह व्यतित केले. हिंदी सेवा मंडळ व श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाचा आदर्श आणि लौकिक त्यांनी वाढवला होता. सदैव चळवळीतील, धडपड करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागे उभे राहिले त्यांना मदतीचा हात ते देत होते. संशोधनासाठी त्यांनी नेहमीच प्रोत्साहन दिले असे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम विभागाचे विभागप्रमुख डॉ.गिरीष कुळकर्णी म्हणाले.
सदर कार्यक्रम प्रसंगी हिंदी सेवा मंडळाचे सचिव मधुलताजी शर्मा, कोषाध्यक्ष एम.डी.तिवारी, व्यायामशाळा चेअरमन पंकजजी संड, कीर्ती संड, रमेश नागरणी, संजय नाहटा, बिशनचंद अग्रवाल, डॉ.रविकांत परदेशी, नंदकुमार अग्रवाल, संजय जोशी तसेच हिंदी सेवा मंडळाचे सर्व सभासद, विभाग प्रमुख डॉ.सुधीर ओझा, डॉ. गिरीश कुलकर्णी, डॉ.पंकज भंगाळे, प्रा.अविनाश पाटील, प्रा.अजित चौधरी, डॉ. दिनेश पाटील उपस्थित होते.