स्व. भाऊसाहेब फुंडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त किराणा साहित्य वाटप

खामगाव, प्रतिनीधी । लोकनेते स्व. भाऊसाहेब फुंडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रभाग क्रमांक ६ चे नगरसेवक सतीश दुडे यांनी आज आपल्या प्रभागातील सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार करत त्यांना किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले आहे.

कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता अविरतपणे साफसफाईचे काम करणाऱ्या सफाई कामगार बद्दल सदभावना व कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या भावनेतून नगरसेवक धुळे यांनी मागील वर्षी देखील हा उपक्रम राबविला होता. या वर्षी देखील हा उपक्रम राबवत यांनी आज आ. आकाश फुंडकर, नगराध्यक्ष अनिता डवरे यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक ६ मधील सफाई कर्मचार्‍यांना किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले आहे.

यावेळी सर्वप्रथम स्व. भाऊसाहेब फुंडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले असून त्यानंतर कोवीड नियमाचे पालन करत सफाई कामगारांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला आहे, व साहित्य हि देण्यात आले आहे. यावेळी आ. आकाश फुंडकर, नगराध्यक्ष अनिता डवरे यांच्यासह भाजप शहराध्यक्ष शेखर पुरोहित, नगरसेवक सतीश टुडे, नगरसेविका संतोषदेवी पुरोहित, संतोष डीडवानी, कृष्णा ठाकूर, दिलीप गुप्ता आदींची उपस्थिती होती.

Protected Content