मुंबई- लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | संगीत विश्वावर अधिराज्य गाजवणार्य गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांची प्राणज्योत मालवली असून त्यांनी उपचार सुरू असतांना शेवटचा श्वास घेतला.
लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. कोरोनाची लागण झाल्यानंतर जवळपास महिनाभर त्या हॉस्पिटलमध्ये होत्या. मात्र काल त्यांची प्रकृती बिघडली. श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती चिंताजनक मात्र स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. लतादीदी उपचाराला प्रतिसादही देत होत्या, मात्र रविवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
लता मंगेशकर यांना ८ जानेवारी रोजी कोरोनाची लागण झाली. सोबतच त्यांना न्यूमोनियाही झाला होता. जवळपास गेल्या ३० दिवसांपासून लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं होते. त्यांच्या निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.