पहिल्या कसोटी सामन्याचा आज शेवटचा दिवस

teem

विशाखापट्टणम वृत्तसंस्था । विशाखापट्टणम येथे पहिल्या कसोटीतील आज ५ व्या आणि शेवटच्या दिवसाचा सामना खेळण्यात येत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, ३९५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ आज मैदानात उतरला असून आफ्रिका संघाने आज ११/१ च्या स्कोअरसह आपल्या खेळाला सुरवात केली आहे. खेळ सुरू होताच आफ्रिकेने दोन गडीही गमावले. लंच ब्रेकमध्ये टीम आफ्रिका ११७/८ वर पोहोचली आहे. सध्या मुथुस्वामी 19 धावांवर आणि डॅन पीट ३२ धावांवर खेळत आहेत. रवींद्र जडेजाने चार गडी बाद केले आहेत. दिवसाचा पहिला बळी रविचंद्रन अश्विनने थेनिस डे ब्रूयनला तंबूत धाडत केली. अश्विनचा कसोटी क्रिकेटमधील हा ३५० वा बळी होता. हा बळी मिळवत अश्विनने सर्वात वेगवान ३५० बळींच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे. अश्विनने हा बळी मिळवल्यानंतर मोहम्मद शमीने तेन्बा बावुमा याला खातेही उघडू न देता तंबूचा रस्ता दाखवला आहे.

Protected Content