Home क्राईम उत्तर प्रदेशात दारुसह मोठा शस्त्रसाठा जप्त

उत्तर प्रदेशात दारुसह मोठा शस्त्रसाठा जप्त


D4PlFdLUYAAdtP9
 

बुलंदशहर (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा हिंसाचार घडवून आणण्याचा कट पोलिसांनी उधळून लावला आहे. बुलंदशहर येथे पोलिसांनी सोमवारी रात्री मोठ्या प्रमाणावर दारु आणि शस्त्रसाठा जप्त केला आहे. नेहमीच्या तपासणीदरम्यान हा शस्त्रसाठा पोलिसांनी जप्त केला आहे.

 

सोमवारी रात्री मोठ्या प्रमाणावर शस्त्रांचा साठा पोलिसांना आढळून आला. यामध्ये ४०५ अवैध हत्यारं, ७३९ कार्ट्रिज, २ कोटी रुपयांचे मद्य, दीड कोटींची रोख रक्कम या मुद्देमालाचा समावेश आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एवढ्या मोठ्या प्रमाणावर आढळून आलेला शस्रासाठा हा मोठा हिंसाचार घडवण्याच्या दृष्टीने जमा करण्यात आला असावा, अशी शक्यता पोलीस प्रशासनाने व्यक्त केली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound