तांबापूर भागातून तरूणाची दुचाकी लंपास

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तांबापूरा भागातील अजमेर गल्लीत पार्किंगला लावलेले दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

अधिक माहिती अशी की, राहूल राजू सोनवणे (वय-२३) रा. शिरसोली नाका, तांबापूरा, जळगाव हा तरूण परिवारासह वास्तव्याला आहे. हातमजूरी करून आपला उदरनिर्वाह करतो. ३ जुलै रोजी रात्री ११ वाजता त्याने त्याची मालकीची (एमएच १९ एटी २४०२) क्रमांकाची दुचाकी तांबापूरात अजमेर गल्लीत पार्किंगला लावली होती. अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री २० हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेल्याचे ४ जुलै रोजी सकाळी ५ वाजता उघडकीला आले. राहूल सोनवणे याने दुचाकीचा सर्वत्र शोधाशोध केली असता दुचाकी मिळून आली नाही. अखेर सोमवारी ११ जुलै रोजी दुपारी १ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील करीत आहे.

 

Protected Content