जळगाव,प्रतिनिधी | येथील शिवतीर्थ मैदानावर “लयभारी दहीहंडी” हा दहीहंडी उत्सव जळगावचा राजा नेहरू चौक मित्र मंडळातर्फे २४ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
यंदा मंडळाचे ५ वे वर्ष आहे. प्रमुख आकर्षण म्हणून लेझर लाईट शो, शहरातील गायकांची सुमधुर गीते, मिमिक्री, नृत्य, तसेच ज्युनियर मकरंद अनासपुरे आणि सनी देओल यांचा कार्यक्रम यावेळी होणार आहे. ढोल पथक देखील असून अत्याधुनिक पद्धतीने सजावट केली जाणार आहे. प्रसंगी मंडळाच्या कार्यकर्त्यांचे कार्यक्रम यशस्वीतेसाठी नियोजन करण्यात आले असून सुरक्षेची काळजीदेखील घेण्यात आली आहे.क्रेनद्वारे दहीहंडी लावली जाणार असून ती २० फुट उंच असणार आहे. प्रसंगी पालकमंत्री ना.गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील, माजी मंत्री सुरेशदादा जैन, आ.चंद्रकांत सोनवणे, आ.चंदुलाल पटेल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी असे आवाहन अध्यक्ष अजय गांधी यांनी केले आहे.