लाचखोर पोलीस नाईकासह खासगी पंटर एसीबीच्या जाळ्यात

शेंदुर्णी प्रतिनिधी । तक्रारदार व त्यांचे कुटूंबीयांच्या नावे निघालेल्या वॉरंटामध्ये त्यांना अटक न करण्याच्या मोबादल्यात पोलीस नाईक आणि त्याचा खासगी पंटरला आज लाच लुचपत विभागाने रंगेहात पकडले. याप्रकरणी दोघांविरोधात पहूर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार जामनेरचे असून त्यांचे व कुटूंबीयांच्या नावे वॉरंट काढण्यात आला होता. निघालेल्या वॉरंटमध्ये त्यांना अटक होऊ नये म्हणून पहुर पोलीस स्टेशन अंतर्गत शेंदुर्णी दुरक्षेत्रात कार्यरत असलेले पोलीस नाईक गजानन काशिनाथ पवार, वय-44 रा.प्लॉट नं.47, सप्तश्रृंगी गगर, निर्मल रेसीडेंसी हॉटेलच्यामागे, भडगाव रोड, पाचोरा यांनी तक्रारदार कडून 4 हजार रूपयांची मागणी केली होती. तडजोडी अंती 13 ऑक्टोंबर रोजी 2 हजार 100 रूपये देण्याचे तक्रारदार यांनी कबुल केले होते. याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत विभागाकडे याप्रकरणी तक्रार दिली होती. त्यानुसार आज 16 ऑक्टोबर रोजी दुपारी एसीबीच्या विभागाने सापळा रचून खासगी पंटरला कडुबा लक्ष्मण पाटील, वय-52, रा. रा.गोंधळपुरा, शेंदुर्णी, ता.जामनेर 2 हजार 100 रूपये घेतांना रंगेहात पकडले. दोघांना ताब्यात घेवून पहूर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केली कारवाई
पोलीस उप अधिक्षक जी.एम.ठाकुर, पोलीस निरीक्षक निलेश लोधी, पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, पो.ना.मनोज जोशी, सुनिल शिरसाठ, पो.कॉ.प्रशांत ठाकुर, प्रविण पाटील, महेश सोमवंशी, नासीर देशमुख, ईश्वर धनगर यांनी कारवाई केली.

Protected Content