मजूराची गळफास घेवून आत्महत्या

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । हनुमान नगरातील बांधकामाच्या साईटवर ३१ वर्षीय तरूणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी १९ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास उघडकीला आली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दत्तात्रय दगडू चौधरी (वय-३१) रा. हनुमान नगर, जळगाव असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, “दत्तात्रय चौधरी हे आपल्या कुटुंबियांसह हनुमान नगरात वास्तव्याला आहे. हातमजूरी करून आपला उदरनिर्वाह करत होता. शुक्रवारी १९ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास दत्तात्रय हा घराजवळील एका बांधकाम साईट येथे बसलेला होता. साईटवरील मजूर जेवणाला गेल्यानंतर त्याने इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली.

दुपारी दीड वाजेच्या सुमारास काही मजूर जेवण करून साईटवर परतले असता, त्यावेळी त्यांना दत्तात्रय हा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यांनी लागलीच ही घटना त्याच्या कुटुंबियांना सांगितली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत दत्तात्रय याला खाली उतरवित जिल्हा रूग्णालयात हलविले. याठिकाणी वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्याची तपासणी करीत त्याला मयत घोषीत केले.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून आत्महत्येचे कारण अद्याप समजून आलेले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Protected Content