Home Cities जामनेर लबाना व बंजारा समाज विश्व संमेलनाच्या पोस्टरचे संतांच्या हस्ते अनावरण

लबाना व बंजारा समाज विश्व संमेलनाच्या पोस्टरचे संतांच्या हस्ते अनावरण

0
53


जामनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील गोदरी येथे 25 ते 30 जानेवारी 2023 रोजी होणाऱ्या बंजारा व लभाना समाज विश्व संमेलन कार्यक्रमाच्या प्रचार पोस्टरचे अनावरण संत नगरी वृंदावन धामपाल येथे श्रद्धेय संत परमपूज्य गोपाल चैतन्य महाराज यांच्या सह संताचा उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी हिम्मत जी महाराज, बुलढाणा शिव चैतन्य महाराज, गणपत महाराज, बुलढाणा कृष्णजी महाराज, धाम लोट मुक्तानंद महाराज, डोंगरगाव चंदन महाराज, बोदरली सर्व चैतन्य महाराज, कन्नड विश्वनंद महाराज, प्रकाश महाराज, इंदोर साहेबराव शास्त्री संभाजीनगर श्याम चैतन्य महाराज, जामनेर दिव्य चैतन्य महाराज, पाल राष्ट्रीय स्वयं संघाचे बाळासाहेब चौधरी, अतुल लिमये, आरोग्य दूत रामेश्वर नाईक यांच्यासह साधक परिवार साधुसंत व प्रत्येक जिल्ह्यातून आलेले बंजारा व लबाना समाजाचे नागरिक व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी साधसंताच्या उपस्थितीत झालेल्या विश्व संमेलन नियोजन बैठकीदरम्यान संतांनी उपस्थित आपल्या वाणीतून सांगितले की, लबाना व बंजारा समाज विश्व संमेलन समाज जनजागृती व समाजाची संस्कृतीचे दर्शन होणार असून यासाठी सर्वांनी एकजूट होऊन विश्व संमेलन पार पाडण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करा, असे आव्हान यावेळी करण्यात आले.


Protected Content

Play sound