Home क्रीडा पिंपरखेडा तांडा येथे युवा नेते मंगेश चव्हाण यांच्याहस्ते कुस्ती आखाड्याचे पूजन

पिंपरखेडा तांडा येथे युवा नेते मंगेश चव्हाण यांच्याहस्ते कुस्ती आखाड्याचे पूजन


kusthi challisgaon

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील गोरखपूर, पिंपरखेडा तांडा येथे कै. चेनसिंग वस्ताद ( पहेलवान ) यांच्या समरणार्थ भव्य कुस्तीची दंगल सोमवारी आयोजित करण्यात आली होती. ४० वर्षांपासून होत असलेल्या कुस्तीच्या दंगलीला भर पावसात या परिसरतील ग्रामस्थांसह तरूणांची उत्स्फुर्त गर्दी केली होती.

आखाडाचे पुजन
युवा नेते मंगेश चव्हाण यांच्याहस्ते आखाडा पुजन करण्यात आले तर उद्घाटन मोरसिंग राठोड यांनी केले. युवा नेते मंगेश चव्हाण यांनी आखाडात पहेलवानांची जोड लाऊन कुस्त्यांच्या दंगलीला सुरवात केली. यावेळी रोहिणीचे सरपंच अनिल नागरे, राजेश राठोड, गौरख राठोड, धनंजय राठोड, नेताजी चव्हाण, मकराम राठोड यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound