पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | कुऱ्हाड खु” येथे सुरू असलेले अवैध धंदे तात्काळ बंद करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन अरुण पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांतर्फे उपविभागीय पोलिस अधिकारी भारत काकडे यांना देण्यात आले.
तालुक्यातील कुऱ्हाड खु” येथे गावठी दारु, पत्ता, सट्टा यासह अनेक अवैध धंदे बोकाळले आहेत. गावातील छोट्या मोठ्या दुकानांवर गावठी दारु, मटका, जुगार सर्रासपणे सुरू आहे. बनावट गावठी दारु पिल्याने अनेक तरुणांना आपला जिव देखील गमवावा लागला आहे. सुरु असलेले अवैध धंदे बंद करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या ठरावासह वारंवार पिंपळगाव (हरेश्र्वर) पोलिस स्टेशनला निवेदन देवुन सुद्धा अवैध धंदे बंद झालेले नसल्याने कुऱ्हाड येथील ग्रामस्थ एकजुट होवुन अवैध धंदे बंद करण्यात यावे. या रास्त मागणीसाठी आज दि. २३ एप्रिल रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी भारत काकडे यांना स्थानिक ग्रामस्थ व महिलांसह ६५ ग्रामस्थांच्या सहृ्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदन देते प्रसंगी अरुण रुपचंद पाटील, सरपंच पती कैलास भगत, उपसरपंच अशोक देशमुख, ग्रामपंचायत सदस्य कौतिक शिवराम पाटील, एमिल कादर काहकर, रमेश मुके, समाधान पाटील, देवराम पाटील उपस्थित होते. तसेच निवेदनाच्या प्रती राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पालकमंत्री गुलाबराव पाटील, पोलिस महासंचालक (मुंबई), विभागीय पोलिस आयुक्त (नाशिक), पोलिस अधीक्षक (जळगांव), पाचोरा – भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर पाटील यांना पाठविण्यात आल्या आहेत. अवैध धंदे तात्काळ बंद न झाल्यास १ मे रोजी महाराष्ट्र दिनी ग्रामस्थ आमरण उपोषण करण्याच्या पावित्र्यात आहेत.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/516372526786931