चाळीसगाव प्रतिनिधी । येथे आज प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेचा शुभारंभ आमदार उन्मेशदादा पाटील यांच्याहस्ते करण्यात आला.
या योजनेंतर्गत चाळीसगाव तालुक्यातील ३७ हजार शेतकर्यांना प्रत्येकी ६००० रुपये अनुदान देण्यात येणार आहे, त्याचा पहिला २००० चा हप्ता आज पंतप्रधानांच्या हस्ते थेट शेतकर्यांच्या खात्यात जमा होणार आहे,
यावेळी जि. प. सभापती पोपट तात्या भोळे, पं. स. उपसभापती संजय पाटील, सदस्य भाऊसाहेब पाटील, प्रांताधिकारी शरद पवार, तालुका कृषी अधिकारी साठे साहेब व लाभार्थी शेतकरी उपस्थित होते.