Home Cities जळगाव क्रीडा संचालक संतोष बडगुजर यांना पीएच.डी. प्रदान

क्रीडा संचालक संतोष बडगुजर यांना पीएच.डी. प्रदान


Bagujar news

जळगाव प्रतिनिधी । शारीरिक शिक्षण या विषय अंतर्गत औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे प्रा.संतोष दिलीप बडगुजर यांना पीएच.डी पदवी प्रदान करण्यात आली.

पीएच.डी संशोधन पूर्ण करण्यासाठी सहाय्यक प्राध्यापक शारीरिक शिक्षण महाविद्यालय, खडकेश्वर औरंगाबाद तसेच राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक डॉ. माणिक राठोड यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. प्रा. संतोष बडगुजर हे सध्या विवेकानंद प्रतिष्ठान संचलित खाशाबा वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात क्रीडा संचालक म्हणून कार्यरत आहे. त्यांच्या या यशाबद्दल प्रा.डॉ.विवेक काटदरे, दिनेश ठाकरे व्यवस्थापन अधिकारी विवेकानंद प्रतिष्ठान तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे. प्रा.संतोष बडगुजर हे माजी सैनिक दिलीप बडगुजर यांचे जेष्ठ पुत्र आहे.


Protected Content

Play sound