Home क्रीडा कोतकर ज्युनियर कॉलेज संघाने राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत पटकावला तृतीय क्रमांक

कोतकर ज्युनियर कॉलेज संघाने राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत पटकावला तृतीय क्रमांक


chalisgaon 3
 

चाळीसगाव (प्रतिनिधी)  येथील के.आर.कोतकर ज्युनियर कॉलेजच्या संघाने राज्यस्तरीय शालेय मोंटेक्स बॉल क्रिकेट स्पर्धत नागपूर विभागाला पराभूत करून नुकताच तृतीय क्रमांक पटकावला आहे.

 

पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय , गोंदिया व महाराष्ट्र राज्य मोंटेक्स बॉल क्रिकेट असोसिएशन यांचा संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय शालेय मोंटेक्स बॉल क्रिकेट स्पर्धा नुकत्याच गोंदिया येथील जिल्हा क्रीडा संकुलात पार पडल्या. या स्पर्धत 8 ही सर्व विभागाचे संघ सहभागी झाले होते. विजयी संघाना जिल्हा क्रीडा अधिकारी सुभाष गँगरेड्डीवार , दुलीचंदजी मेश्राम व कॉलेजचे क्रीडा संचालक प्रा.खुशाल देशमुख यांच्या हस्ते प्रदान झाले.

 

के.आर.कोतकर ज्युनियर कॉलेजच्या संघाच्या विजयाबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील,क्रीडा अधिकारी एम. के.पाटील, रेखा पाटिल,अरविंद खांडेकर, गुलाने मॅडम यांनी अभिनंदन केले आहे. तर चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे बोर्ड चेअरमन नारायण अग्रवाल, सचिव डॉ.विनोद कोतकर, सिनियर कॉलेज समितीचे चेअरमन डॉ. एम.बी.पाटील, ज्युनिअर कॉलेज समितीचे चेअरमन शामलाल कुमावत, क्रीडा समितीचे अध्यक्ष क.मा.राजपूत, प्राचार्य डॉ. मिलिंद बिल्दींकर, उपप्राचार्य बी.आर.येवले, सनियर कॉलेजचे क्रीडा संचालक प्रा.संजय सोनवणे यांनी संघाला पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound