यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील कोरपावली ग्रामपंचायत तथा महेलखेडी ग्रामपंचायत व येथे जळगाव जिल्हा काँग्रेस सेवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ.बाबाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त येथे १४ एप्रिल रोजी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्यात सद्या कोरोना विषाणु संसर्गाची परिस्थिती अत्यंत भयावह असून , राज्याच्या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रक्ताचा तुटवडा असल्याचे जाहीर केले आहे. त्यांच्या या आवहानास प्रतिसाद देत कोरपावली ग्रामपंचायत कार्यालय परिसरात भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीचे औचित्य साधुन भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या रक्तदान शिबीरात परिसरातील ज्या रक्तदात्यांना रक्तदान कराव्याचे आहे त्यांनी उद्या बुधवार दि. १४ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता शिबीरात आपली उपस्थिती देवुन या राष्ट्रीय कार्यक्रमास सहकार्य करावे असे आवाहन कॉंग्रेस सेवा फाउंडेशनचे जिल्हा अध्यक्ष जलील सत्तार पटेल, कोरपावलीचे सरपंच विलास नारायण अडकमोल, उपसरपंच हमीदाबी पिरण पटेल व सर्व ग्राम पंचायत सदस्य महेलखेडीच्या सरपंच शरीफा तडवी उपसरपंच सौ. माया महाजन यांनी केले आहे. कोरोना संसर्ग संकटाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमास येणाऱ्या सर्वांनी शासनाचे सर्व नियम अटी आणि सोशल डिस्टनसिंग, मास्क व सर्व प्रकारच्या कोरोनाचे नियम पाळून कार्यक्रमास सहभागी व्हावे असेही आवाहन आयोजक सरपंच उपसरपंच सदस्य ग्राम पंचायत कोरपावली व सरपंच उपसरपंच सदस्य महेलखेडी ग्राम पंचायत यांनी केले आहे.