पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । पदमवंशीय तेली समाज विकास मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे पिंपळगाव (हरेश्वर)येथे कोरोना योद्ध्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन संगमनेरचे उपजिल्हाधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्याहस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. आर. बी. तेली (वरिष्ठ समिती सदस्य तथा माजी वैद्यकीय अधिकारी) हे होते. गेल्या दोन वर्षांपासून कोरना महामारी मुळे प्रत्येक समाजाची खूप हानी झाली. अनेक जवळचे नातेवाईक या महामारी दरम्यान गमावले आहेत. असा हा कोरोना राक्षस रूपाने सर्वत्र पसरला होता. सर्वजण आपापल्या परीने आपला जीव वाचविण्यासाठी घरामध्येच राहून आपली व परिवाराची रक्षा करत होते. मात्र या काळात अनेकांकडून माणुसकीचे दर्शन झाले. या काळात डॉक्टर, फार्मासिस्ट, नर्स, पोलीस, शिक्षक इत्यादींकडून अत्यावश्यक सेवा पुरविण्यात आल्या. जीवाची परवा न करता रस्त्यावर उतरून हे सर्व काम करत होते. त्यामुळे या सर्व कोरोना काळातील योद्ध्यांचा सत्कार करणे हे समाजाचे कर्तव्य समजून महाराष्ट्र राज्य तेली समाज मंडळाकडून सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन संगमनेरचे उपजिल्हाधिकारी व समाजाचे भूषण डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्या हस्ते झाले. दीपप्रज्वलन करून व स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमात सर्व कोरोना योद्धांचा सत्कार करून शिवजयंतीनिमित्त पिंपळगाव (हरेश्वर) महिला कमिटीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे बक्षीस वितरण करण्यात आले.
समाजातील अनेक दानशूर दात्यांनी बक्षीसे, दिनदर्शिका कार्यक्रमासाठी लागणारे साहित्य मंडप, साऊंड सिस्टिम, खुर्च्या, अन्नदान, तसेच पिंपळगाव (हरेश्वर) येथे होणाऱ्या मंगल कार्यालय मंगल कार्यालयासाठी भरभरून आर्थिक योगदान दिले. अशा सर्वांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. यामध्ये मंगल कार्यालयासाठी ग्रामपंचायत सदस्य व माजी सरपंच अजय तेली यांनी ५० हजार रुपये, भगवान ढाकरे यांनी बोरवेल, मिश्रीलाल झेरवाल यांनी ५ हजार १०० रूपये, रमेश चौधरी यांनी ३ हजार १३१ रुपये, संजय ढाकरे यांनी २ हजार १०० रुपये, बालचंद्र ढाकरे यांनी २ हजार १०० रूपये व सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी राधेश्याम माहोर यांनी १० हजार रुपये असे योगदान दिले.
मान्यवरांनी व्यक्त केले मनोगत
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र कमिटीचे सचिव राजेंद्र ठाकरे यांनी केले व सुरू असलेल्या उपक्रमांबाबत व मागील काळात राबविलेल्या उपक्रमांची माहिती दिली तसेच मंचावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांकडून मार्गदर्शन मिळावे व आपण सर्वांनी समाजासाठी भरभरून सरळ हाताने सहकार्य करावे असे मत मांडले. त्यानंतर कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी आपल्या भाषणात समाजातील सर्व बंधू – भगिनींना मार्गदर्शन केले तसेच समाज संघटित होणे ही काळाची गरज आहे. व समाजात अनेक नविन उपक्रम सुरू आहेत तसेच अनेक उपक्रम सुरु करण्यात यावे असे मत व्यक्त केले. तसेच समाजातील विविध क्षेत्रात कोरोना काळात आपण सर्वांनी मेहनत घेतली त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले.
६०० कोरोना योद्धांचा गौरव
विद्यमान महाराष्ट्र राज्य कमिटीचे अध्यक्ष डॉ. शांतीलाल तेली व यांच्या टीमने अनेक नवीन उपक्रमांना सुरुवात केली आहे. त्याबद्दल त्यांनी संपूर्ण टीमला शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन केले तसेच समाजाची दिनदर्शिका काढल्याने सर्वांचे कौतुक केले. या कार्यक्रमात पाचोरा, जामनेर, धुळे, सोयगाव तालुक्यातून तालुक्यातील ३२ गावातील समाज बांधव व भगिनी उपस्थित होत्या. यात सुमारे ६०० कोरोना योद्धांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य कमिटीचे सल्लागार व माजी अध्यक्ष डॉ. आर. बी. तेली हे होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी समाजात सुरू असलेल्या नवनवीन उपक्रमांचे कौतुक केले तसेच पिंपळगाव (हरेश्वर) येथे होणाऱ्या तेली समाज मंगल कार्यालय साठी एक लाख रुपयांची मदत जाहीर केली. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन हे पिंपळगाव (हरेश्वर) येथील स्थानिक पुरुष व महिला कमिटी यांच्याकडे होते.
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भगवान ठाकरे (डी. एफ. ओ., नागपूर) डॉ. आर. एन. झेलवार (वरिष्ठ कमिटी सदस्य, माजी अध्यक्ष), नामदेव मंगरुळे (वरिष्ठ सल्लागार सदस्य), डॉ. विशाल ढाकरे (एम.डी. मेडिसिन), सुभाष सरताळे (माजी कृषी अधिकारी, नांदेड), भारत पाचोळे (पी.एस.आय. सोयगाव), गणेश झेलवार (पी.एस.आय. जालना), राजेश दसरे (आर.एफ.ओ., जळगाव), सुभाष बिंदवाल (वरिष्ठ सल्लागार सदस्य तथा पत्रकार), प्रदीप ढाकरे (माजी अध्यक्ष), रघुनाथ मंगरुळे (सुफलाम सीड्स, जळगांव), डॉ. प्रशांत चौधरी (बाल रोग तज्ञ), अजय ठाकरे (पी.एस.आय.,पुणे) तसेच महाराष्ट्र पदमवांशिय तेली समाजाचे अध्यक्ष डॉ. शांतीलाल नैनाव, उपाध्यक्ष शिवा झेलवार, उपाध्यक्षा अलका लहीवाल, सचिव राजेंद्र ठाकरे, सहसचिव राजेंद्र चौधरी, कार्याध्यक्ष प्रभुलाल झेरवाल, सहकार्यध्यक्ष प्रकाश दसरे, कोषाध्यक्ष दिपक मंडावरे, सहकोषाध्यक्ष संजय झेरवाल, युवा अध्यक्ष संदीप सरताळे, सहयुवा अध्यक्ष संदीप ठाकरे तसेच सर्व सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी यांनी घेतले परिश्रम
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तंतोतंत नियोजन व मोलाचे मार्गदर्शन महाराष्ट्र राज्य कमिटीचे सचिव राजेंद्र ठाकरे तसेच कोषाध्यक्ष संजय झेरवाल यांनी केले. यासाठी पिंपळगाव (हरेश्वर) येथील स्थानिक कमिटीचे अध्यक्ष चंद्रकांत महोर, उपाध्यक्ष मिश्रीलाल झेरवाल, सचिव अजय नैनाव व सर्व सदस्य, महिला कमिटीच्या अध्यक्षा वंदना संजय झेरवाल, उपाध्यक्षा तुळसा माहुरे, सचिव ज्योती नैनाव व सर्व सदस्य तथा पिंपळगाव (हरेश्वर) येथील समाज बांधव यांनी मेहनत घेतली तसेच जुगल किशोर ठाकरे, सुनिल परदेशी, माधव नगरे, राजू नगरे, संदीप मंडावरे, अजय नैनाव, प्रशांत नैनाव, अमोल झेरवाल, गायत्री झेरवाल, रामकोर उदणे यांनी नियोजन तसेच सूत्रसंचालन केले तर उपस्थितांचे आभार संजय झेरवाल यांनी मानले.