कोळी समाज बहुउद्देशीय प्रतिष्ठानतर्फे गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कोळी समाज बहुउद्देशीय प्रतिष्ठान, जिल्हा जळगाव यांच्या वतीने आज नवीन बालविकास प्राथमिक विद्यामंदिर, जळगाव येथे वह्या वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला. संस्थेकडून सातत्याने राबविल्या जाणाऱ्या विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचा हा एक महत्त्वाचा भाग असून, प्रामुख्याने गरजू विद्यार्थ्यांना याचा विशेष लाभ मिळाला.

या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष रविभाऊ कोळी, उपाध्यक्ष संजीव भाऊ बाविस्कर, सचिव अनिल कोळी, खजिनदार सुधाकर बाविस्कर यांची प्रमुख उपस्थिती होती. यासोबतच, उद्योगपती गोपाळशेठ नन्नवरे, नीलूआबा तायडे, गोकुळदादा सूर्यवंशी, सतीश सपकाळे, दीपक कोळी, रतन बिऱ्हाडे, जय सोनवणे, प्रवीण सोनवणे, दिनेश कोळी आणि प्रसिद्धी प्रमुख प्रा. भाऊसाहेब सोनवणे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

कोळी समाज बहुउद्देशीय प्रतिष्ठान हे समाजातील गरजू घटकांना, विशेषतः विद्यार्थ्यांना, मदत करण्यासाठी नेहमीच पुढाकार घेते. आजच्या वह्या वाटप कार्यक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत मिळाल्याने त्यांच्या पालकांनी समाधान व्यक्त केले. संस्थेच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.