जळगाव प्रतिनिधी । अखिल भारतीय कोळी समाज संस्थेची बैठक येथे उत्साहात पार पडली असून यात समाजाच्या एकत्रीकरणासह अन्य महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली.
अखील भारतीय कोळी समाज संस्थेची बैठक राष्ट्रीय अध्यक्ष कुंवर भावलीया व प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार कांतीभाई कोळी यांच्या अध्यक्षतेत झाली. या बैठकीत समाजाचा एकीकरणाचा ठराव मांडण्यात आले. तसेच याप्रसंगी ११ सदस्यांची समिती तयार केली. ही समिती समस्या निवारण्यासाठी पंतप्रधानांची भेट भेट घेणार आहे. या वेळी खासदार सत्यनारायण पवार (उज्जैन), आमदार सुखराम कोळी (राजस्थान), आमदार कनुभाई पटेल (गुजरात), प्रभारी महिलाध्यक्षा द्रौपदी कोळी, प्रदीप नवसारे, माजी उप महापौर गणेश सोनवणे, अॅड. किशोर कोळी, प्रदीप नवसारे, प्रभाकर सोनवणे, राजेंद्र रायसिंग आदींसह समाजबांधव उपस्थिती होते. यशस्वीतेसाठी जिल्हाध्यक्ष दिनेश सोनवणे, सचिव अॅड. वसंत भोलाणकर, गणेश सोनवणे, धनराज साळुंखे यांनी सहकार्य केले.