कोल्हापूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | कोल्हापूर उत्तरच्या विजयाने भाजपच्या विखारी प्रचाराला चोख प्रत्युत्तर दिले असून देशभरात भाजपला रोखण्यासाठी कोल्हापूर फॉर्म्युला गरजेचे असल्याची प्रतिक्रिया मंत्री सतेज पाटील यांनी दिली आहे.
आज कोल्हापूर उत्तर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेसच्या जयश्री जाधव यांनी विजय मिळविल्याने महाविकास आघाडीच्या गोटात उत्साहाचे वारे संचारले आहे. या विजयाचे शिल्पकार ठरलेत ते मंत्री संतेज पाटील याबाबत म्हणाले की, भाजपाच्या विकारी प्रचाराला जनतेने विचाराने उत्तर दिले आहे. ही शाहू महाराजांची भूमि आहे येथे पोलरायझेशन चालत नाही हे दाखवून दिले आहे. मायक्रो प्लॅनिंग जर केल तर नक्कीच भाजपाचा पराभव होऊ शकतो हे २०१९ च्या निवडणूकीत आम्ही दाखवून दिले आहे. याचबरोबर उत्तरच्या निवडणूकीतही दाखवून दिले आहे.
सतेज पाटील पुढे म्हणाले, भाजपाला थांबवण्यासाठी कोल्हापूर निवडणूकीचा हा फॉर्म्यूला देशभर घेऊन जाणे गरजेचं असल्याचेही ते म्हणाले. ते पुढे म्हणाले, उध्दव ठाकरे यांनी सांगितल्यानंतर शिवसेना ऍक्टीव्ह झाली होती. कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, शेकाप अशा सर्वंच पक्षाने ताकदीने मदत केली. आज जो विजय झाला तो संघटीत विजय आहे. चंद्रकांत पाटील यांच्याविषयी बोलताना ते म्हणाले, चंद्रकांतदादांना २०१९ ला उत्तर दिलं होतं. या निवडणूकीत गुंडांची फौज घेऊन ते आले होते. पुण्यातील गुंड त्यांच्या गाडीतून फिरत असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यांनी पैशाचा वारेमाप वापर केला. कोल्हापूरला विकत घेण्याचा प्रयत्न, महिलांना बदमान करण्याचा प्रयत्न, माझी वैयक्तिक बदमानीचा प्रयत्न केला. मात्र कोल्हापूरकरांनी त्यांचा प्रयत्न हाणून पाडला असे सतेज पाटील म्हणाले.