नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज 2019-20 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. पण ज्या मध्यमवर्गीयांनी मोदी सरकारला मोठ्या अपेक्षेने निवडून दिले होते, त्यांच्या हाती या अर्थसंकल्पातून काहीच लागलेले नाही. दुसरीकडे इंधन आणि सोन्यावर कर लावून एकप्रकारे महागाईला निमंत्रण दिले गेले आहे. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर जाणून घ्या..काय झालं स्वस्त आणि कोणत्या वस्तू झाल्या आहेत महाग !
पेट्रोल आणि डिझेल या इंधनावरील सीमा शुल्कामध्ये एक रुपया प्रति लीटर वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल महागणार आहे. तसेचर सोने आयात शुल्क कर १० टक्क्यांवरुन थेट १२.५ टक्के एवढा करण्यात आला आहे. त्यामुळे सोने यावरील टॅक्स हा थेट २.५ टक्के वाढला आहे. त्यामुळे सोने खरेदी महागणार आहे. त्यामुळे सोने दर प्रति तोळा ३५ हजारांच्या घरात पोहोचणार आहे. तसेच सोने याबरोबरच चांदी महागणार आहे. तर तंबाखूजन्य वस्तूही या अर्थसंकल्पानंतर महागणार आहेत.
महाग-
एसी
सीसीटीव्ही कॅमेरा
पेट्रोल, डिझेल
सोनं
साबणासाठी वापरली जाणारी तेलं
प्लास्टिक
रबर
इम्पोर्टेड फर्निचर
पुस्तकं, वृत्तपत्रांचा कागद
टाईल्स
वाहनांच्या चेसिज
लाऊड स्पीकर
काजू
लाउडस्पीकर
व्हिडिओ रेकॉर्डर
सीसीटीव्ही कॅमेरा
सिगारेट
तंबाखू
ऑप्टिकल फायबर
ऑटो पार्ट्स
टाईल्स
स्टेनलेस उत्पादन
सिंथेटिर रबर
पिव्हीसी
धातूंच्या वस्तू
फ्रेमचे सामान
वाहनाचे हॉर्न
स्वस्त
गृहकर्ज
इलेक्ट्रिक कार
साबण
सॅनिटरी नॅपकीन
शाम्पू
हेअर ऑईल
टूथपेस्ट
कपडे धुण्याचे पावडर
पंख्याचे सामान
ट्रॅव्हेल्स बॅग
कंटेनर
स्वंयपाक घरातील भांडे
चादर
चश्म्याची फ्रेम
खोबरे (सुके)
मोबाईल फोनचे चार्जर
मोबाईल फोनच्या बॅटरी
सेट टॉप बॉक्स
नाफ्ता