नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सध्या सुप्रीम कोर्टात इलेक्टोरल बाँडबाबतचे प्रकरण सुरू आहेत. यादरम्यान सुप्रीम कोर्टाने एसबीआयला सर्व तपशील उघड करावे कोणताही तपशील लपवू नये, त्या माहितीत इलेक्टोरल बाँडची संख्या देखील समाविष्ट आहे. त्यानंतर २१ मार्चपर्यत सुप्रीम कोर्टाने एसबीआयला इलेक्टोरल बाँडशी संबंधित सर्व माहिती सार्वजनिक करावी असा आदेश दिला आहे.
निवडणूक आयोगाने १७ मार्च रोजी एसबीआयकडून मिळालेल्या इलेक्टोरल बाँडची आकडेवारी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार वेबसाइटवर सार्वजनिक केली. यात इलेक्टोरल बाँड खरेदी करणाऱ्या अनेक मोठया कंपन्याचा समावेश आहे. या आकडेवारीनुसार फ्यूचर गेमिंग, मेघा इंजिनीअरींग, क्क्सिप्लायचेन या कंपन्यानी सर्वात जास्त इलेक्टोरल बाँड खरेदी केले आहेत.
लक्ष्मी निवास मित्तल, लक्ष्मीदास वल्लभदास मर्चंट, इंदर ठाकूरदास जयसिंघानी, राजेश राजेश मन्नालाल अग्रवाल, हरमेश राहुल जोशी आणि राहुल जगन्नाथ जोशी, किरण मुझुमदार शॉ या व्यक्तीनी ही इलेक्टोरल बाँड खरेदी केले आहे. एप्रिल २०१९ ते जानेवारी २०२४ दरम्यान किमान ३३३ व्यक्तींनी ३५८.९१ कोटी रुपयांचे इलेक्टोरल बाँड खरेदी केले आहेत.
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार इलेक्टोरल बाँड खरेदीमध्ये लक्ष्मी मित्तल यांनी १८ एप्रिल २०१९ रोजी त्यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान ३५ कोटी रुपयांचे इलेक्टोरल बाँड खरेदी केले. अजंता फार्मा लिमिटेडचे मालक राजेश अग्रवाल यांनी जानेवारी २०२२ ते ऑक्टोबर २०२३ दरम्यान १३ कोटी रुपयांचे इलेक्टोरल बाँड खरेदी केले. ओम फ्रेट ग्रुप ऑफ कंपनीचे हरमेश जोशी आणि राहुल जोशी यांनी जानेवारी २०२२ आणि नोव्हेंबर २०२३ मध्ये प्रत्येकी १० कोटी रुपयांचे इलेक्टोरल बाँड खरेदी केले. बायोकॉनच्या अध्यक्षा किरण शॉ यांनी एप्रिल २०२३ मध्ये ६ कोटी रुपयांचे इलेक्टोरल बाँड खरेदी केले.
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चार्टर्ड अकाउंटंट लक्ष्मीदास वल्लभदास मर्चंट यांनी नोव्हेंबर २०२३ मध्ये २५ कोटी रुपयांचे इलेक्टोरल बाँड खरेदी केले. राहुल भाटिया यांनी एप्रिल २०२१ वैयक्तिकरित्या २० कोटी रुपयांचे इलेक्टोरल बाँड खरेदी केले. कंचर्ला योडा ग्रुपचे चेअरमन आणि देवांश लॅब वर्क्सचे संस्थापकचे सुधाकर कंचर्ला यांनी १२ एप्रिल २०२३ रोजी ५ कोटी रुपयांचे इलेक्टोरल बाँड खरेदी केले. सीरॉक इन्फ्राप्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक अभिजित मित्रा यांनी ऑक्टोबर २०२३ मध्ये ४.२५ कोटी रुपयांचे इलेक्टोरल बाँड खरेदी केले.
पॉलीकॅब ग्रुप ऑफ कंपनीचे अध्यक्ष इंदर ठाकूरदास जयसिंघानी यांनी एप्रिल आणि ऑक्टोबर २०२३ मध्ये १४ कोटी रुपयांचे इलेक्टोरल बाँड खरेदी केले. खाण व्यवसायात असणाऱ्या इंद्राणी पटनायक यांनी १० मे २०१९ रोजी ५ कोटींचे इलेक्टोरल बाँड खरेदी केले. इंडिगोच्या इतर तीन संस्था – इंटरग्लोब एव्हिएशन, इंटरग्लोब एअर ट्रान्सपोर्ट आणि इंटरग्लोब रिअल इस्टेट व्हेंचर्स यांनीही एकूण ३६ कोटी रुपयांचे इलेक्टोरल बाँड खरेदी केले.