पाचोरा प्रतिनिधी । परधाडे दुसखेडा, वडगाव, टेक येथे समाधान पाटील सर व जि.प.सदस्य पदमसिंह पाटील यांच्या नेतृत्वात जोरदार आमदार किशोर पाटील यांची प्रचारार्थ रॅली काढण्यात आली. यावेळी आमदार किशोर पाटील यांना निवडून देण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला.
शिवसेना भाजपा युती सरकारने केलेल्या विकास कामांमुळे जनता समाधानी आहे. याची प्रचीती प्रत्येक गावात मिळणारा प्रतिसाद पाहुन होत आहे. शिवसेनाला जनतेची मिळणारी भरभरून साथ पाहता विरोधकांना आपला पराभव आत्ताच दिसत आहे. जनता आता विकास करणार्या पक्षाच्या मागे उभी आहे, जनतेच्या मनात जो विकास अपेक्षित आहे, तोच विकास आपण मतदार संघात घडवुन आणु यासाठी शिवसेनेला मतदान करून पाठीशी उभे रहा, असे आवाहन महायुतीचे उमेदवार, किशोर आप्पा पाटील यांच्या प्रचारार्थ रँलीत करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
यावेळी मुकुंद आण्णा बिल्डिकर, देवरे आबा, संजय गोहिल, शरद पाटे, युवराज आबा, मनोहर चौधरी, समाधान पाटील व जि.प.सदस्य पदमसिंह पाटील, समाधान पाटील, डि.के.पाटील, विनोद पाटील, साहेबराव पाटील, गोपाल पाटील, राजु तायडे, सुनिल पाटील, रविंद्र रूपसिंग पाटील, युवासेना जितु पाटील, दिपक पाटील, अविभाऊ पाटील, जनार्दन बडगुजर, सागर पाटील, संदिप पाटील यांच्यासमवेत शिवसेना व युवासेना आणि भाजप पदाधिकारी लोकप्रतिनिधी उपस्थित होते.