Home राजकीय उध्दव ठाकरेंच्या पार्टरनरचे कसाबशी संबंध : सोमय्यांचा गंभीर आरोप

उध्दव ठाकरेंच्या पार्टरनरचे कसाबशी संबंध : सोमय्यांचा गंभीर आरोप

0
31

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची अनेकांसोबत भागिदारी असून त्यांच्या एका पार्टनरचे दहशदवादी अजमल कसाब यांच्याशी संबंध असल्याचा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी लावला आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर घणाघाती आरोप केले आहेत. नवाब मलिक चे संबंध दाऊदशी आहेत तर ठाकरे यांच्या पार्टनर चे संबंध कसाब पर्यंत आहेत. उद्धव, रश्मी, आदित्य, तेजस आणि त्यांचा मामा हे पार्टनर तरी नेमकं कुणाकुणाचे आहेत? असा सवाल त्यांनी केला आहे. हेमंत करकरे यांची हत्या कसाबने केली पण त्यांचं जॅकेट हे बुलेटप्रुफ होतं. मग हे जॅकेट नकली होतं आणि ते दिलं होतं विमल अग्रवाल यांनी. असा आरोप करत त्यांनी उद्धव ठाकरे यांचे कसाबशी कसे संबंध असल्याचा आरोप केला.

या पत्रकार परिषदेत किरीट सोमय्या म्हणाले की, यशवंत जाधव आणि विमल अगरवाल यांची एक कंपनी आहे आणि यशवंत जाधव हा उद्धव ठाकरे यांचा उजवा हात आहे, त्यांची १००० कोटीची जागा आहे मग ठाकरे परिवार आणि यशवंत जाधव यांचे कसे संबंध आहेत असा सवाल सोमय्या यांनी केला आहे. तसेच राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ यांनी १५८ कोटींचे मनी लॉंड्रींग केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.


Protected Content

Play sound